Ajaz Patel मुंबईत जन्मलेल्या एजाझने टीम इंडिया विरुद्ध केली सर्वोत्तम कामगिरी

Ajaz Patel take 10 wickets in an innings न्यूझीलंडकडून खेळत असलेल्या एजाझ पटेलचा जन्म मुंबईतच झाला आहे. न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळत त्याने टीम इंडिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. 

Ajaz Patel take 10 wickets in an innings
मुंबईत जन्मलेल्या एजाझने टीम इंडिया विरुद्ध केली सर्वोत्तम कामगिरी 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत जन्मलेल्या एजाझने टीम इंडिया विरुद्ध केली सर्वोत्तम कामगिरी
  • एजाझ पटेलने भारताला केले 'ऑलआऊट'
  • भारताचा डाव ३२५ धावांत आटोपला

Ajaz Patel take 10 wickets in an innings मुंबईः न्यूझीलंडकडून खेळत असलेल्या एजाझ पटेलचा जन्म मुंबईतच झाला आहे. जन्मानंतर घरच्यांसोबत तो न्यूझीलंडला गेला. तिथेच लहानाचा मोठा झाला आणि न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळत त्याने टीम इंडिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. 

मुंबई टेस्टमध्ये भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी लंच नंतर थोड्या वेळाने संपला. भारताने सर्वबाद ३२५ धावा केल्या. न्यूझीलंडच्या एजाझ पटेलने भारताच्या दहा विकेट घेतल्या. एका डावात प्रतिस्पर्धी संघाच्या सर्व खेळाडूंना बाद करण्याचा विक्रम करणारा एजाझ पटेल हा जगातील तिसरा गोलंदाज आहे. याआधी इंग्लंडच्या जीम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळेने अशी कामगिरी केली आहे.

एजाझ पटेलने ४७.५ ओव्हर टाकून ११९ धावा देत दहा विकेट घेतल्या. ज्या देशात जन्मला त्या देशाविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सर्वोच्च स्थानी पोहोचला. 

  1. १०/११९ – एजाझ पटेल, न्यूझीलंड विरुद्ध भारत, २०२१
  2. ६/४९ – गुलाबभाई रामचंद, भारत विरुद्ध पाकिस्तान, १९५५
  3. ६/६३ – अँडी कॅडिक, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, २००२
  4. ६/७७ – डेव्हॉन माल्कम, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, १९९०

भारताने पहिल्या दिवशी केल्या २२१ धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. यामुळे मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीला महत्त्व आले आहे. या कसोटीत भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद २२१ धावा केल्या. टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताकडून सलामीवीर मयांक अग्रवालने नाबाद १२० धावा केल्या. यात चौदा चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. मयांकच्या साथीला आलेल्या शुभमन गिलने सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे दोघे शून्यावर बाद झाले. श्रेयस अय्यर १८ धावा करुन परतला. भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याने नाबाद २५ धावा केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी