कानपूर: फलंदाजी कोच विक्रम राठोड(batting coach vikram rathore) यांना नक्की माहीत आहे की चेतेश्वर पुजारा(cheteshwar pujara) आणि अजिंक्य रहाणे(ajinkya rahane) असे खेळाडू आहेत जे आपल्या कसोटी करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. मात्र माजी सलामीवीर रविवारी याबाबत कोणतेही निश्चित उत्तर देऊ शकले नाही की न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील कसोटीत विराट कोहलीच्या परतण्याने अंतिम ११मधून कोणता खेळाडू बाहेर पडेल. श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीत १०५ आणि ६५ धावा केल्यानंतर मुंबईच्या या खेळाडूला नक्कीच बाहेर ठेवले जाणार नाही. तीन डिसेंबरपासून मुंबईत सुरू होत असलेल्या कसोटीच्या आधी पुजारा आणि रहाणेच्या फॉर्मबाबत फलंदाजी कोच राठोड यांना या प्रश्नांचा नक्कीच सामना करावा लागणार आहे. ajinkya rahabne or cheteshwar pujara? who will dropped from second test match against new zealand
ते म्हणाले, निश्चितपणे वरच्या फळीतील फलंदाजांच्या योगदानाची अपेक्षा करत असाल मात्र ज्या क्रिकेटरबद्दल तुम्ही सांगत आहात ते ८० आणि ९० कसोटी खेळले आहेत.
राठोड यांनी कार्यवाहक कर्णधार रहाणेचा २०पेक्षा कमी आणि उप कर्णधार पुजाराच्या ३०.४२च्या २०२१च्या कसोटी सरासरीचा बचाव करताना म्हटले की निश्चितपणे इतके सामने खेळून त्यांनी आमच्यासाठी चांगलेच केले आहे. सध्या दोघेही वाईट फॉर्मातून ातआहेमात्र आम्हाला माहीत आहे की गेल्या काही काळात त्यांनी आमच्यासाठी उत्तमोत्तम खेळी केली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते नक्की पुनरागमन करतील आणि आमच्यासाठी महत्त्वाच्या खेळी खेळतील.
कोहलीच्या परतण्याने कोण बाहेर जाणार? हा प्रश्न विचारल्यावर राठोड म्हणाले, कर्णधार परत येत आहे. ते पुढील सामन्यात होईल. जेव्हा आम्ही मुंबईला पोहोचू तेव्हा यावर निर्णय घेऊ. सध्या या सामन्यावर लक्ष आहे. यातील एक दिवसाचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकावा लागेल. जेव्हा मुंबईला पोहोचू तेव्हा यावर बोलू.