मुंबईकर रोहित शर्माला मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचं मराठीतून उत्तर...

अजिंक्य रहाणेनं आपली पत्नी राधिकासोबत एक फोटो पोस्ट केला. त्यावर रोहित शर्मानं कमेंट केली आणि त्यावर अजिंक्यनं चक्क मराठीतून कमेंट केली आहे. अजिंक्यर रहाणेनं एका हॉटेलमधला फोटो शेअर केला.

rohit sharma and Ajinkya rahane
मुंबईकर रोहित शर्माला मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचं मराठीतून उत्तर  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाचे क्रिकेटर सध्या आपल्या कुटुंबासोबत आपली सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.
  • आपल्या सुट्टीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात.
  • अजिंक्य रहाणेनं आपली पत्नी राधिकासोबत एक फोटो पोस्ट केला.

काही दिवसांपूर्वी टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीनही कसोटी सामने जिंकून यजमानांना मोठा धक्का दिला आहे. कसोटी मालिकेत आफ्रिकेवर भारताने मिळवलेला हा ऐतिहासिक विजय आहे. त्यानंतर आता टीम इंडियाचे क्रिकेटर सध्या आपल्या कुटुंबासोबत आपली सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. तसंच सर्व क्रिकेटर्स सोशल मीडियावर अपडेट असतात. आपल्या सुट्टीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. आताच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला तर रोहित शर्मा सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करतोय. त्यातच अजिंक्य रहाणेनं आपली पत्नी राधिकासोबत एक फोटो पोस्ट केला. त्यावर रोहित शर्मानं कमेंट केली आणि त्यावर अजिंक्यनं चक्क मराठीतून कमेंट केली आहे. 

अजिंक्यर रहाणेनं एका हॉटेलमधला फोटो शेअर केला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी राधिका देखील आहे. या फोटोवर अजिंक्यनं कॅप्शन दिलं की, Diwali shopping with @radhika_dhopavkar!  Special shopping this time for the special one at home. (दिवाळीची खरेदी राधिकासोबत...यावेळी घरातल्या खास व्यक्तीसाठी खास खरेदी) 

Ajiknya rohit

या फोटोवर रोहित शर्मानं कमेंट केली आहे. Shopping ?? Looks like a freaking buffet to me (खरेदी ?? मला एक जेवणाच्या टेबलसारखं दिसतंय. ) त्यावर अजिंक्यनं रिप्लाय केला की, @rohitsharma45 Arre shopping nantar lunch pan! Tula pan bolavto next time ( रोहित शर्मा अरे शॉपिंग नंतर लंचपण! तुला पण बोलवतो नेक्स्ट टाइम. ) 

Ajinkya reply

रोहित शर्माची ही कमेंट जवळपास ७८८ पेक्षाहून जास्त लोकांनी लाईक केली तर अजिंक्यच्या कमेंटला ९८२ हून जास्त लोकांनी लाईक्स केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Diwali shopping with @radhika_dhopavkar! ? Special shopping this time for the special one at home! ?‍?‍?

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

याव्यतिरिक्त फोटोच्या कॅप्शनमध्ये अजिंक्यनं एका खास व्यक्तिसाठी खरेदी असा उल्लेख केला आहे. ही खास व्यक्ती म्हणजे अजिंक्य रहाणेची चिमुकली. ५ ऑक्टोबरला अजिंक्य बाबा झाला.  राधिकानं एका गोडसं मुलीला जन्म दिला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hello

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

हरभजन सिंगनं ट्विटरवर ही गोड बातमी शेअर केली. त्यानंतर अजिंक्यनं आपल्या मुलीसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी