Ind Vs Sa: करिअर पणाला लागले असताना हा एकच मंत्र बोलतोय अजिंक्य रहाणे

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 27, 2021 | 18:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ind Vs Sa, Ajinkya Rahane:द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत अजिंक्य रहाणेही चांगल्या लयमध्ये दिसत होता. 

ajinkya rahane
करिअर पणाला लागले असताना हा एकच मंत्र बोलतोय अजिंक्य रहाणे 
थोडं पण कामाचं
  • पहिल्या कसोटीत भारताची स्थिती मजबूत
  • पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणे चांगल्या टचमध्ये

मुंबई: द. आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये(india vs south africa) खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरूवात केली. पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी आपला दम दाखवला. लोकेश राहुलने(lokesh rahul) शानदार शतक ठोकले. मात्र यापेक्षा चांगली बाब म्हणजे खराब फॉर्मशी लढणाऱ्या अजिंक्य रहाणेही(ajinkya rahane) चांगल्या लयमध्ये दिसला. ajinkya rahane says 'watch the ball' during match against south africa

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अजिंक्य रहाणेने नाबाद ४० धावांची खेळी केली होती. यात त्याने ८ चौकार लगावले होते. म्हणजेच ३२ धावा केवळ बाऊंड्रीतून आल्या होत्या. खास गोष्ट म्हणजे जेव्हा अजिंक्य रहाणे बॅटिंग करत होता तेव्हा तो सतत काहीतरी बोलत होता आणि आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होता. 

अजिंक्य रहाणे फलंदाजी करताना सतत ‘Watch The Ball, Watch The Ball असे म्हणत होता आणि स्वत:चे लक्ष बॉलवर केंद्रित करत होता. द. आफ्रिकेच्या पिवर बॉल वेगाने येतो आणि स्विंगही करतो अशातच कोणत्याही फलंदाजासाठी तेथे खेळणे सोपे नसते. खासकरून तेव्हा जेव्हा त्याचे करिअर पणाला लागले आहे आणि तो संघात आपल्या जागेसाठी संघर्ष करत आहे. रहाणेच्या या मंत्राने काम केले आणि पहिल्या दिवशी त्याने जे शॉट खेळले ते शानदार होते. अजिंक्य रहाणे चांगल्या टचमध्ये दिसला आणि विराट कोहलीची विकेट पडल्यानंतर त्याने राहुलला चांगली साथ दिली.

अजिंक्य रहाणेच्या बॅटमधून ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मोठा स्कोर झालेला नाही. इंग्लंडविरुद्धची मालिका असो वा न्यूझीलंडविरुद्धची मालिका अजिंक्य रहाणे मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरला. याच कारणामुळे कसोटी संघातील त्याचे उप कर्णधारपद काढून घेण्यात आले. सोबतच त्याच्या जागी श्रेयस अय्यरलाही खेळवण्याबाबत चर्चा सुरू होती. 

पुजाराचा गोल्डन डक

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ( India vs South Africa )वसेंच्युरियन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत पुजाराला गोल्डन डक मिळाला होता. म्हणजेच पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) आपला शिकार बनवले. पुजाराला दुसऱ्यांदा गोल्डन डक (Golden Duck) झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी