Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या घरी दुसर्‍यांदा कुणीतरी येणार, पत्नी राधिकाने शेअर केला गोड फोटो

भारतीय टेस्ट टीमचा वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणे पुन्हा बाप होणार आहे. अजिंक्यची पत्नी राधिकाने ही गुड न्युज दिली आहे. राधिकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राधिका, अजिंक्य आणि त्यांची मुलगी आहे. नुकतंच भारत आणि इंग्लड मध्ये झालेल्या टेस्टमध्ये रहाणे नव्हता. रहाणे सध्या क्रिकेटपासून दूर असून आपल्या कुटुंबीयांसोबत तो वेळ घालवत आहे.

ajinkya rahane and wife
अजिंक्य रहाणे  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • भारतीय टेस्ट टीमचा वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणे पुन्हा बाप होणार आहे.
  • जिंक्यची पत्नी राधिकाने ही गुड न्युज दिली आहे.
  • राधिकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

Ajinkya Rahane:  भारतीय टेस्ट टीमचा (Indian Cricket Team) वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा बाप होणार आहे. अजिंक्यची पत्नी राधिकाने (Ajinkya Rahane Wife Radhika) ही गुड न्युज दिली आहे. राधिकाने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक फोटो शेअर (Photo Share) केला आहे. या फोटोमध्ये राधिका, अजिंक्य आणि त्यांची मुलगी आहे. नुकतंच भारत आणि इंग्लड (ind vs eng) मध्ये झालेल्या टेस्टमध्ये (Test Cricket) रहाणे नव्हता. रहाणे सध्या क्रिकेटपासून (Cricket) दूर असून आपल्या कुटुंबीयांसोबत तो वेळ घालवत आहे. 

अधिक वाचा : Virat Kohli shared VIDEO On Instagram: Virat Kohli ने अनुष्का-वामिकासोबत सुट्टीच्या मूडमध्ये; चाहत्यांसाठी खास Recap Reel शेअर

२०१४ साली अजिंक्य आणि राधिकाने लग्न केले होते. अजिंक्य आणि राधिकाला २०१९ साली एक मुलगी झाली होती. आता तीन वर्षानंतर राधिका आणि अजिंक्य आई वडील होणार आहेत. राधिकाने  इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ऑक्टोबर २०२२ अशी कॅप्शन लिहून एका लहान बाळाचा आणि हार्ट इमोजी पोस्ट केल आहे. या पोस्टवर नेटकर्‍यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशनही रहाणे दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टला आतापर्यंत खुप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. 

अधिक वाचा : Neeraj Chopra Javelin throw: नीरज चोप्राची आणखी एक शानदार कामगिरी, चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी क्वालिफाय

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारती क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरोधात दुसर्‍यांना टेस्ट सीरीज जिंकल्या होत्या. त्यानंतर अजिंक्यचा परफॉर्मन्स सातत्याने खालावत केला. दरम्यान अजिंक्यला अनेक संधी मिळाल्या तरी रहाणेला चांगली कामगिरी बजावता अलई नाही. अशा वेळी टीम मॅनेजमेंटने त्यांच्याकडून व्हाईस कॅप्टनशीप काढून घेतली आणि त्याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंटर डोमेस्टिक क्रिकेटमध्येही रहाणेला चांगली कामगिरी दाखवण्यात अपयश आले. अशा वेळी रहाणे कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

अधिक वाचा : WI दौऱ्यापूर्वी टीम इंडिया धक्का, Kl Rahul कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी