IND vs NZ: अजिंक्य रहाणेच्या खराब कामगिरीनंतरही सचिन, कपिलला सोडू शकतो मागे

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 23, 2021 | 18:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New Zealand Test Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. २५ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरूवात होत आहे. 

ajinkya rahane
रहाणेच्या खराब कामगिरीनंतरही सचिन, कपिलला सोडू शकतो मागे 
थोडं पण कामाचं
  • अजिंक्य रहाणेने आतापर्यंत ५ कसोटी सामन्यात टीमइंडियाचे नेतृत्व केले आहे.
  • त्यात त्याला एकदाही पराभव पत्करावा लागलेला नाही
  • ४ सामन्यांत त्याने विजय मिळवला आहे तर एक कसोटी अनिर्णीत राहिली.

मुंबई: भारत(india) आणि न्यूझीलंड(new zealand) यांच्यात २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला(test series) २५ नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. याआधी टी-२० मालिकेत टीम इंडियाने(team india) ३-०ने विजय मिळवला होता. तेव्हा रोहित शर्मा(rohit sharma) कर्णधार होता. मात्र तो आता कसोटीत खेळणार नाही आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेने(Ajinkya Rahane) पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहितशिवाय कसोटी कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) पहिल्या कसोटीत खेळणार नाही आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा(WTC) भाग आहे. जूनमध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंड संघाने टीम इंडियाला मात दिली होती. 

अजिंक्य रहाणेने आतापर्यंत ५ कसोटी सामन्यात टीमइंडियाचे नेतृत्व केले आहे. त्यात त्याला एकदाही पराभव पत्करावा लागलेला नाही. ४ सामन्यांत त्याने विजय मिळवला आहे तर एक कसोटी अनिर्णीत राहिली. ऑस्ट्रेलियामध्ये संघाने विजय मिळवला होता. तेथे त्यांनी २ कसोटी सामने जिंकले होते. अजिंक्य रहाणेने जर पहिली कसोटी जिंकली तर ते कर्णधार म्हणून हा त्याचा पाचवा कसोटी विजय असेल. अशातच तो सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यासारख्या दिग्गजांना मागे टाकेल. दरम्यान, सध्या अजिंक्य रहाणे खराब फॉर्मात आहे. दोघांनी कर्णधार म्हणून ४-४ कसोटी सामन्यांत विजय मिळवला आहे. कपिलने ३४ तर सचिनने २५ कसोटी सामन्यांत नेतृत्व केले. 

विराट कोहली टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत ६५ सामन्यांत नेतृत्व केले. ३८ सामन्यांत त्याला विजय मिळाला. तर १६ सामन्यांत पराभव. ११ सामने अनिर्णीत राहिले. एमएस धोनी २७ सामन्यांसह दुसऱ्या तर सौरव गांगुली २१ विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. अन्य कोणताही कर्णधार २० विजय मिळवू शकलेला नाही. 

न्यूझीलंडच्या संघाने भारतात आतापर्यंत ३४ कसोटी सामने खेळले आहेत. यात संघाला केवळ दोनदा विजय मिळवलेला आहे. जर १६मध्ये पराभव. १६ सामने अनिर्णीत राहिले. अशातच केन विल्यमसन्ससाठी हा मार्ग नक्कीच सोपा असणार नाही. न्यूझीलंडचा सघ १९८८नंतर भारतात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.  

न्यूझीलंड कसोटीआधी भारताला धक्का

गुरुवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुल मंगळवारी आगामी दोन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला. भारताचा सलामीवीर केएल राहुल दुखापतग्रस्त असून दोन्ही कसोटीत तो प्लेइंग 11 मध्ये नक्कीच दिसणार नाही. केएल राहुलला डाव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली आहे.  त्यामुळे तो आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी