Ind Vs NZ Test: रोहित, पंत आणि बुमराहला आराम, पहिल्या कसोटी रहाणे करणार नेतृत्व

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 12, 2021 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Team For New Zealand Tests: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आगामी कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. याचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. 

ajinkya rahane
Ind Vs NZ Test: रोहित, पंत, बुमराहला आराम, रहाणेकडे नेतृत्व 
थोडं पण कामाचं
  • भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीमची घोषणा केली
  • कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे पहिली कसोटी
  • कसोटीआधी दोन्ही देशांदरम्यान होणार तीन सामन्यांची टी-२० मालिका

मुंबई: उप कर्णधार अजिंक्य रहाणे(vice captain ajinkya rahane) कानपूरमध्ये(kanpur) होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध(new zealand) २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत(test match) भारतीय संघाचे(indian team) नेतृत्व करणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहली(virat kohli) मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत जबाबदारी सांभळण्यासाठी परतणार आहे. नवीन नियुक्ती झालेला टी-२० कॅप्टन आणि नियमित सलामीवीर रोहित शर्मा, विकेटकीपर ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीम बुमराह आणि मोहम्मद शमीला बीसीसीआयच्या नितीनुसार आराम देण्यात आला आहे. Ajinkya rahane will lead first test match against new zealand

बीसीसीआयचं विधान

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एका विधानात म्हटले की, विराट कोहली दुसऱ्या कसोटीसाठी संघात परतेल आणि संघाचे नेतृत्व करेल. मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने ऑफ स्पिनर जयंत यादवसोबत कसोटीत पुनरागमन केले आहे. कसोटी मालिकेआधी तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. 

अशा प्रकारची आहे टीम

भारतीय कसोटी संघ अशा प्रकारे आहे - अजिंक्य रहाणे(कर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा(उप कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमन साहा(विकेटकीपर), के एस भरत(विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. 

येत्या १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्याच्या टी २० संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाची कमान रोहित शर्माकडे तर उपकर्णधार पद हे केएल राहुलकडे देण्यात आले आहे. या सिरीजसाठी विराट कोहली, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच शार्दुल ठाकूर, वरूण चक्रवर्ती, राहुल चहर यांना डच्चू देण्यात आला आहे. या संघात व्यंकटेश अय्यर, आवेश खान आणि  हर्षल पटेल  यांना संधी देण्यात आली आहे. व्यंकटेश अय्यर, आवेश खान आणि हर्षल पटेल हे भारतीय संघात पहिल्यांदा स्थान मिळाले आहे. 

NZ विरुद्ध भारत T20 संघ | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, आर पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार. दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी