Akshay Karnewar: कर्नेवारची कमाल, ४ ओव्हरमध्ये ५ धावा देत घेतल्या ४ विकेट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 10, 2021 | 17:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akshay Karnewar dangereous bowling: अक्षयच्या घातक बॉलिंगच्या जोरावर विदर्भने सिक्कीमला १३० धावांनी हरवले आहे. 

akshay karnewar
Akshay Karnewar: कर्नेवारची कमाल, ४ ओव्हरमध्ये ५ रन,४ विकेट 
थोडं पण कामाचं
  • अक्षय कर्नेवारने मणिपूरविरुद्ध ४ ओव्हरमध्ये एकही रन दिला नाही. 
  • स्पिनर अक्षय दोन्ही हातांनी गोलंदाजी करणाऱ्यांपैकी एक आहे. 
  • अक्षयने सिक्कीमविरुद्ध ४ ओव्हरमध्ये ५ रन्स देत ४ विकेट घेतल्या. 

मुंबई: दोन्ही हातांनी गोलंदाजी करणाऱा स्पिनर अक्षय़ कर्नेवारच्या(Akshay Karnewar) फिरकीची जादू सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेत चांगलीच चालते आहे. अक्षय़ने सिक्कीमविरुद्ध प्लेट ग्रुप सामन्ात आपल्या ४ ओव्हरच्या स्पेलमध्ये केवळ ५ धावा देत ४ विकेट मिळवल्या. २०६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली सिक्कीमची टीम विदर्भच्या या गोलंदाजासमोर ८ बाद ८५ धावाच करू शकली. अशा पद्धतीने त्यांनी सिक्कीमला तब्बल १३० धावांनी हरवले. अक्षयची सगळ्यात चांगली बाब म्हणजे तो दोनही हातांनी गोलंदाजी करतो. Akshay Karnewar plays 4 over, 5 runs and 4 wicket

विदर्भने ५ बाद २०५ धावा केल्या होत्या. 

सामन्याबाबत बोलायचे झाल्यास विदर्भने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद २०५ धावा केल्या होत्या. जितेश शर्माने नाबाद सर्वाधिक ५४ धावा केल्या. तर कर्णधार अक्षय वाडकरने ४० धावांची खेळी केली. सिक्कीमकडून सुमित सिंह आणि पल्जोर तमांगने दोन दोन विकेट घेतल्या. 

मणिपूरविरुद्ध ४ ओव्हरमध्ये रन्स न देताना मिळवल्या २ विकेट

याआधी सोमवारी अक्षयने मणिपूरविरुद्ध खेळताना ४ ओव्हरमध्ये एकही रन न देताना २ विकेट मिळवल्या होत्या. डाव्या हाताचा स्पिनर अक्षय पुरुष टी-२० क्रिकेटमध्ये चार ओव्हरमध्ये ० धावा देणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. 

अक्षयने सलग तीन ओव्हर गोलंदाजी केली आणि त्यानंतर त्याला आक्रमणापासून हटवले ेले. त्याने आपल्या दोन ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. मात्र त्याला या गोष्टीची जाणीवच नव्हती ती तो वर्ल्ड रेकॉर्ड बनवत आहे. जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये त्याला हे सांगण्यात आले तेव्हा त्याला समजले. त्याने आपल्या शेवटच्या ओव्हरमध्येही कोणताही रन दिला नाही आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनला. 

अक्षयने ही शानदार कामगिरी प्लेट ग्रुप सामन्यात केली. हा सामना विजयवाडाच्या आंध्र क्रिकेट अकादमी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलाय 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी