World Cup 2019: रक्तबंबाळ झाल्यानंतरही खेळला हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

आज वर्ल्ड कप २०१९ मधला दुसरा सेमीफायनलचा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला. यजमान इंग्लंडनं ऑस्ट्रेलियावर मात करत फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र या सामन्यात काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली. 

Alex Carey
रक्तबंबाळ झाल्यानंतरही खेळला हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अलेक्स कॅरी खेळताना रक्तबंबाळ
  • रक्तबंबाळ झाल्यानंतरही कायम
  • इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात

बर्मिंघमः आज वर्ल्ड कप २०१९ मधला दुसरा सेमीफायनलचा सामना रंगला. यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात हा सामना झाला. यावेळी यजमान इंग्लंडनं ऑस्ट्रेलियावर मात करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली. तब्बल २७ वर्षांनंतर इंग्लंडनं वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडनं टॉस जिंकू पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंग्लंडच्या टीमनं ऑस्ट्रेलियाच्या टीमला तीन सुरूवातीला झटके देत बॅकफूटवर आणलं. इंग्लंडच्या फास्टर बॉलर्संनी ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना मैदानावर टिकू दिलं नाही. यावेळी या सामन्यात काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली. 

जोफ्रा आर्चर आणि वोक्सनं सुरूवातीला काही ओव्हर्समध्ये स्विंग बॉलिंगनं शानदार प्रदर्शन केलं. या सामन्याच्या दरम्यान एक अशी घटना बघायला मिळाली जी मैदानावर उपस्थित असलेल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारी होती. ऑस्ट्रेलियाच्या खेळीचा आठवा इंग्लंडचा फास्टर बॉलस  ओव्हर जोफ्रा आर्चर टाकत होता. समोर विकेटकीपर बॅट्समन अलेक्स कॅरी बॅटिंग करत होता. आर्चरच्या ओव्हरच्या शेवटचा बॉल खूप वेगानं आला आणि तो बॉल थेट कॅरीच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. बॉलचा वेग इतका होता की, बॉल थेट कॅरीच्या हेल्मेटला लागला हेल्मेट डोक्यातून निघालं आणि तो बॉल कॅरीच्या हनुवटीवर बसला. बॉल बसताच कॅरी रक्तबंबाळ झाला. कॅरी हनुवटीमधून रक्त येऊ लागलं. जेव्हा कॅरी मैदानात खेळण्यासाठी आला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था ही ३ आऊट १४ अशी होती. 

त्यानंतर बॉल लागताच  कॅरीनं ड्रेसिंग रूमच्या दिशेनं इशारा केला आणि फिजियो यांनी उशीर न करता मैदानात पोहोचले. लागल्यानंतरही कॅरीनं आपला खेळ सोडला नाही. तो जखमी अवस्थेत खेळत राहीला. यामुळे कॅरीमं आपल्या टीमसाठी असलेलं समर्पण आणि सशक्तीकरणाचा परिचय करून दिला. दरम्यान कॅरी आपली खेळी जास्त पुढे घेऊन जाऊ शकला नाही. कॅरीनं ७० बॉलमध्ये ४६ रन करत आदिल रशिदच्या बॉलवर आऊट झाला. 

ही पहिली वेळ नाही आहे की कोणतातरी ऑस्ट्रेलियन खेळाडू जखमी झाल्यानंतरही  मैदानात आपला खेळ कायम ठेवत आहे.  याआधी वर्ल्ड कप २०११ मध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाचा फास्टर बॉलक ब्रेट ली सुद्धा जखमी झाला होता. त्यावेळी त्यांन जखमी झाल्यानंतरही मैदानात आपला खेळ कायम ठेवला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी