All-rounder Shardul Thakur's wife Mithali blushed : केएल राहुल आणि अक्षर पटले पाठोपाठ भारताचा ऑलराउंडर शार्दुल ठाकुर विवाहबंधनात अडकला. भारताचा स्टार क्रिकेटपटू शार्दुल ठाकुर आणि मिताली परुलकर यांचे लग्न मुंबईत धुमधडाक्यात झाले. या विवाह सोहळ्याला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, त्याची पत्नी आणि इतर निमंत्रित क्रिकेटपटू उपस्थित होते. या विवाह सोहळ्याआधी झालेल्या संगीत आणि हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हळदीच्या कार्यक्रमात शार्दुलने मित्रमंडळी आणि घरातल्यांसोबत झिंगाट गाण्यावर नृत्य केले. लग्नानंतर दांपत्याच्या गृहप्रवेशावेळी शार्दुल आणि मिताली यांनी उखाणे घेतले. याप्रसंगी शार्दुलने क्रिकेट आणि लग्न यांचा मिलाफ साधत एक छान उखाणा घेतला. हा उखाणा ऐकून मितालीसह उपस्थित असलेल्या सगळ्यांनी शार्दुलचे कौतुक केले.
शार्दुल आणि मिताली यांचे लग्न सोमवार 27 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत झाले. आधी हे लग्न गोव्यात होणार होते. पण काही कारणांमुळे हा सोहळा नंतर मुंबईत पार पडला. लग्नाला रोहित शर्मा आणि त्याची पत्नी तसेच श्रेयस अय्यर, अभिषेक नायर, सिद्धेश लाड हे क्रिकेटपटू उपस्थित होते. स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा पण उपस्थित होती.
लग्नाआधी शार्दुल आणि मिताली यांचा साखरपुडा नोव्हेंबर 2021 मध्ये झाला. दोघेही दीर्घकाळ एकमेकांना ओळखत होते. आता या ओळखीचे रुपांतर नात्यात झाले आहे. मितालीची एक स्टार्टअप कंपनी आहे. तिचा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे.
शार्दुल ठाकुर (31) क्रिकेटमध्ये करिअर करत आहे. त्याने 8 टेस्ट मॅच खेळून 27 विकेट, 34 वन डे खेळून 50 विकेट, 25 टी 20 खेळून 33 विकेट, 75 आयपीएल मॅच खेळून 82 विकेट घेतल्या आहेत. तसेच शार्दुलने 8 टेस्ट मॅच खेळून 254 धावा, 34 वन डे खेळून 298 धावा, 25 टी 20 खेळून 69 धावा, 75 आयपीएल मॅच खेळून 173 धावा केल्या आहेत.
झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?
चाणक्य निती : पत्नी पतीपासून या गोष्टी लपवून ठेवते
घरातल्या झुरळांचा बंदोबस्त करण्याचे सोपे प्रभावी उपाय
शार्दुलची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सीरिजसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. तसेच आयपीएल 2023 मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे.