Asia cup: आशिया कप २०२२ साठी सर्व संघाची घोषणा, पाहा पूर्ण वेळापत्रक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 27, 2022 | 09:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Asia cup squads: आशिया कप २०२२ ची सुरूवात यूएईमध्ये २७ ऑगस्टपासून होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार आहे. तर भारत आपल्या अभियानाची सुरूवात २८ ऑगस्टपासून पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. 

asia cup
आशिया कप २०२२ साठी सर्व संघाची घोषणा, पाहा पूर्ण वेळापत्रक 
थोडं पण कामाचं
  • या बहुराष्ट्रीय स्पर्धेत या वर्षी भारताशिवाय ६ संघ भाग घेत आहेत
  • यात पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तानचे संघ सामील आहेत.
  • एक अन्य संघ क्वालिफायर राऊंडनंतर संघासोबत जोडली जाणार आहे.

मुंबई: आशिया कप २०२२ची(asia cup 2022) सुरूवात येत्या २७ ऑगस्टपासून होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका(srilanka) आणि अफगाणिस्तान(afganistan) यांच्यात रंगणार आहे. तर भारत २८ ऑगस्टला पारंपारिक पाकिस्तानविरुद्ध(india vs pakistan) भिडणार आहे. आशिया कपच्या १५व्या हंगामाचे यजमानपद श्रीलंकेला मिळाले होते मात्र देशात सुरू असलेल्या आर्थिक संकट पाहता बोर्डाने आपले हात मागे खेचले. All teams announce for asia cup 2022

अधिक वाचा - मलायका अरोरा बनली गुंतवणूकदार, सुरू केला नवीन बिझने

या बहुराष्ट्रीय स्पर्धेत या वर्षी भारताशिवाय ६ संघ भाग घेत आहेत यात पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तानचे संघ सामील आहेत. एक अन्य संघ क्वालिफायर राऊंडनंतर संघासोबत जोडली जाणार आहे. या संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसह क्वालिफाय करणारा संघ असणार आहे. ग्रुप बीमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिसतान आहेत. 

आशिया कपसाठी सर्व संघ

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान.

स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर. 

पाकिस्तान - बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर

अफगानिस्तान: मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान (उपकर्णधार), अफसर जजई (विकेटकीपर), अजमतुल्लाह ओमरजई, फरीद अहमद मलिक, फजल हक फारूकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम जादरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह जादरान, नूर अहमद, नजीबुल्ला जादरान, नूर अहमद रहमानुल्ला गुरबाज, राशिद खान, समीउल्लाह शिनवारी. 

रिजर्व खेळाडू: निजात मसूद, कॅस अहमद, शराफुद्दीन अशरफ।

बांग्लादेश: शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक, मुशफ़‍िकुर रहीम, अफ़‍ि‍फ हुसैन, मोसद्देक हुसैन, महमुदउल्‍लाह रियाद, महेदी हसन, मोहम्‍मद सैफ़ुद्दीन, हसन महमूद, मुस्‍ताफ़‍िजु़र रहमान, नासुम अहमद, शब्‍बीर रहमान, महेदी हसन मिराज, इबादत हुसैन, परवेज हुसैन इमॉन, नुरुल हसन सोहन, तस्‍कीन अहमद. 

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), धनुषका गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, बानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वनिदु हसरंगा, महेश थीक्षाना, जेफ़री वांडरसे, प्रवीण जयविक्रेमा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, चामिका फर्नांडो, मदुशंका, मथीशा पथिराना, दिनेश चांदीमल, नुवानिंदु फर्नांडो और कसुन रजिता।

अधिक वाचा - तुमच्या मोबाईलमध्ये 5G सपोर्ट आहे की नाही?

असे आहे वेळापत्रक

२७ ऑगस्ट शनिवार  श्रीलंका वि अफगाणिस्तान 
२८ ऑगस्ट रविवार   भारत वि पाकिस्तान
३० ऑगस्ट मंगळवार बांगलादेश वि अफगाणिस्तान
३१ ऑगस्ट बुधवार   भारत वि क्वालिफायर
१ सप्टेंबर    गुरूवार  श्रीलंका वि बांगलादेश
२ सप्टेंबर   शुक्रवार  पाकिस्तान वि क्वालिफायर
३ सप्टेंबर   शनिवार   बी १ वि बी २                   सुपर ४
४ सप्टेंबर   रविवार    ए १ वि ए २                     सुपर ४
६ सप्टेंबर   मंगळवार  ए १ वि बी १                   सुपर ४
७ सप्टेंबर   बुधवार     ए २ वि बी २                   सुपर ४
८ सप्टेंबर   गुरूवार    ए १ वि बी २                   सुपर ४
९ सप्टेंबर   शुक्रवार    बी १ वि ए २                   सुपर ४
११ सप्टेंबर  रविवार     फायनल सामना

सर्व सामने संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतील. 

बीसीसीयचे सचिव जय शाहने आशिया कपचे वेळापत्रक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले. त्यांनी लिहिले, अखेर प्रतीक्षा संपली. कारण आशियाई वर्चस्वासाठी २७ ऑगस्टपासून सामने सुरू होत आहेत. ११ सप्टेंबरला फायनल सामना खेळवला जाईल. आशिया कपचा १५वा हंगाम टी-२० वर्ल्डकप आधीच्या महत्त्वाची तयारी करेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी