मुंबई: महिला वर्ल्डकप २०२२च्या(womens world cup 2022) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने(australia beat england) इंग्लंडला हरवत खिताब आपल्या नावे केा. कांगारू संघाने हा सामना ७१ धावांनी जिंकला. ही सातवी वेळ होती जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्डकपमध्ये जिंकला होता. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या अलीसा हीलीने कमालीची कामगिरी केली आणि तिला प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट निवडण्यात आले. हीलीने वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त धावा केल्या आणि फायनलमध्येही ऐतिहासिक खेळी केली. या कारणामुळे त्याला खिताब देण्यात आला. तिचा पती मिशेल स्टार्कनेही वर्ल्डकपमध्ये प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट खिताब जिंकला होता. Alyssa Healy and mitchell starc got icc player of the tournament award in respective world cup
अधिक वाचा - MG ZS EV 8 सेकंदात तासाभरात पोहोचेल 100 किमी अंतरावर
अलीसाने वर्ल्डकपमध्ये ९ सामने खेळले आणि ५६.५६च्या सरासरीने५०९ धावा केल्या. तिचा स्ट्राईक रेट १०३.६७ होाता आणि तिच्या बॅटमधून ६९ चौकार आणि एक षटकार निघाला. अलिसा पहिली महिला खेळाडू आहे जिने वर्ल्डकपमध्ये ५००हून अधिक धावा बनवल्या. फायनलमध्ये तिने १७० धावांची ऐतिहासिक खेळी केली आणि आपल्या संघाला विजय बनवले. ती वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. पहिल्या विकेटसाठी हीलीने रेचलसह १६० धावांची भागीदारी केली.
आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये ५०९ धावांची खेळी करणाऱ्या अलिसाचा पती मिशेल स्टार्कनेही याआधी हा खिताब जिंकला आहे. २०१५च्या वर्ल्डकपमध्ये स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याने २२ विकेट मिळवल्या होत्या. त्याने फायनल आणि सेमीफायनलमध्येही कमालीचे प्रदर्शन केले होता. यानंतर त्याला प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट पुरस्कार देण्यात आला होता. हे दोघेही २०१६मध्ये लग्नबंधनात अडकले होते.
अधिक वाचा - संगीतकार रिकी केजने भारतीयांसाठी दिली खुशखबर
मिशेल स्टार्क आणि एलिसा हीली ९ वर्षाच्या वयातच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आणि १७ वर्षांनी लग्न केले होते. २०१४मध्ये यांच्या प्रेमाचा एक नमुना पाहायला मिळाला होता. जेव्हा महिला आणि पुरुष वर्ल्डकप बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचा पुरुष संघ लवकर स्पर्धेतून बाहेर गेला होता. मात्र महिला संघ फायनलच्या शर्यतीत होी. अशातच ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघ आपल्या देशात परतला होता मात्र स्टार्क आपल्या गर्लफ्रेंडला सपोर्ट करण्यासाठी तिथेच थांबला होता.