Big News: अमेरिकेला मिळाले टी-२० वर्ल्डकपचे तिकीट, भारताविरुद्ध खेळू शकतो हा भारतीय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 12, 2022 | 15:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

USA to debut in Cricket World Cup: टी-२० वर्ल्डकप २०२४ यूएसए आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. सहयजमानपद मिळाल्याने अमेरिकेचा पुरुष राष्ट्रीय संघ आपोआप क्वालिफाय झाली आहे. 

america team
Big News: अमेरिकेला मिळाले टी-२० वर्ल्डकपचे तिकीट 
थोडं पण कामाचं
  • टी-२० वर्ल्डकप २०२४साठी यूएसए पुरुष संघाने केले क्वालिफाय
  • अमेरिकन पुरुष क्रिकेट संघ २०२४चे करणार सहयजमानपद
  • टी-२० वर्ल्डकप २०१४ यूएसए आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार

दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(ICC) सोमवारी यूएसए पुरुष क्रिकेट संघाच्या(usa menc cricket team) टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये क्वालिफाय करण्याच्या बातमीस दुजोरा दिला. २०२४या हंगामात अमेरिका आणि वेस्ट इंडिज(west indies) संयुक्तपणे यजमानपद करणार आहे. सहयजमानपद सांभाळणार असल्याने अमेरिकेच्या पुरुष संघाने आपोआप क्वालिफाय केले आहे. यूएसए क्रिकेटने आयसीसीच्या बोर्डाच्या निर्णयाचे स्वागत केले. आयसीसीने महिला टी-२० वर्ल्डकप २०२४च्या क्वालिफिकेशनच्या माध्यमाचीही घोषणा केली. American mens cricket team qualify for t-20  world cup 2024

अधिक वाचा - या झाडांच्या लाकडाचे फर्निचर ठेवू नका घरात, होईल नुकसान

पहिल्यांदा वर्ल्डकपमध्ये दिसणार अमेरिका

अमेरिकेचा संघ पहिल्यांदा एखाद्या वर्ल्डकपसाठी क्वालिफाय झाला आहे. ही पहिली संधी असणार आहे जिथे नॉर्थ अमेरिका एवढ्या मोठ्या क्रिकेट इव्हेंटचे यजमानपद करणार आहे. ५५ सामन्यांपैकी दोन तृतीयांश सामने कॅरेबियन देशात खेळवले जातील तर उरलेले सामने अमेरिकेत खेळले जाण्याची शक्यता आहे. अमेरिका क्रिकेटनुसार येथे पाच ठिकाणे आहेत ज्यातील काहींना आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली आहे. काहीचे निर्मितीकार्य सुरू आहे. तर काही ठिकाणे ही वर्ल्डकप आयोजनासाठी पुन्हा तयार केली जाणार आहेत. 

टी-२० वर्ल्डकपमध्ये बदल

टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये पहिल्यांदा २० संघ भाग घेणार आहे. स्पर्धेसाठी १२ संघ आपोआप क्वालिफाय करतील तर उरलेल्या ८ संघामधून दोन यजमानपद सदस्य जोडले जातील. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट रँकिंग असलेले दोन संघक्वालिफाय करतील. 

टीम इंडियाला या भारतीय खेळाडूचे आव्हान

यूएसए संघाने २०२४च्या वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय करत इतिहास रचला आहे. पहिल्यांदा क्रिकेट इतिहासात चाहते अमेरिकन संघाला टी-२० वर्ल्डकपमध्ये स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. यूएसए टीममध्ये काही दिवसांपूर्वीच उन्मुक्त चंद सामील झाला आहे. तो मूळचा भारतीय आहे. 

अधिक वाचा - अत्यंत अशुभ मानल्या जातात 'या' घटना

उन्मुक्त चंद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकला नाही मात्र डोमेस्टिक स्तरावर त्याचे मोठे नाव आहे. त्याच्या नेतृत्वात त्याने भारताला अंडर १९ वर्ल्डकपचे जेतेपद मिळवून दिले होते. २०२४मधील टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा सामना अमेरिकेशी झाल्यास उन्मुक्त चंद भारताविरुद्ध खेळताना दिसू शकतो.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी