Aus vs NZ:भारतीय क्रिकेट खेळाडू अमित मिश्राने न्यूझीलंडला जिंकवलं, नंतर बदलला आपला निर्णय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 15, 2021 | 14:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Amit Mishra mistakenly congratulates New Zealand Cricket Team: ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवत टी-२० वर्ल्डकप खिताब जिंकला आहे. फायनलनंतर अमित मिश्राने विजयाच्या शुभेच्छा देताना चूक केली. 

australia
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड फायनलनंतर या भारतीय खेळाडूने केली चूक 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाने टी-२० वर्ल्डकप आपल्या नावे केला. 
  • कांगांरू संघाने न्यूझीलंडला फायनलमध्ये धूळ चारली
  • अमित मिश्राने चुकीच्या संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

मुंबई: ऑस्ट्रेलियाने(australia) रविवारी टी-२० वर्ल्डकप २०२१(t-20 world cup) ही ट्रॉफी आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये न्यूझीलंडला(new zealand) ८ विकेटनी हरवले. कांगारू संघ पहिल्यांदा टी-२० वर्ल्डकरवर आपले नाव कोरले. या विजयानंतर ऑस्ट्रेलियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अनेक जण ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा देत आहेत. भारताचा स्पिनर अमित मिश्रानेही(amit mishra) ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या मात्र त्याच्याकडून एक मोठी चूक झाली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ऐवजी न्यूझीलंड संघाला विजयी शुभेच्छा दिल्या. Amit Mishra mistake during wishing australia team for t-20 world cup

यानंतर अमित मिश्राला ट्रोल केले जाऊ लागले. मात्र त्याने लगेचच आपली चूक सुधारली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि स्पिनरच्या चुकीच् ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. मिश्राने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, वर्ल्डकप जिंकल्यावर न्यूझीलंड संघाला शुभेच्छा. शानदार टीम एफर्ट. खूपच छान कामगिरी. जेव्हा मिश्राला आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्याने हे ट्वीट डिलीट केले. त्यानंतर न्यूझीलंडच्या जागी ऑस्ट्रेलिया संघाला शुभेच्छा दिल्या. 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून गुप्टिलने २८, मिचेलने ११, कॅप्टन असलेल्या विल्यमसनने ८५, फिलिप्सने १८, नीशामने नाबाद १३, सीफर्टने नाबाद ८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने ३ आणि झम्पाने १ विकेट घेतली. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने ५३, कॅप्टन असलेल्या फिंचने ५, मार्शने नाबाद ७७, मॅक्सवेलने नाबाद २८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने २ विकेट घेतल्या.

फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून नाबाद ७७ धावांची खेळी करणारा मिचेल मार्श मॅन ऑफ द मॅच झाला तर संपूर्ण टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत उत्तम कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर मॅन ऑफ द सीरिज झाला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी २० वर्ल्ड कप जिंकला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २ वेळा आणि वन डे वर्ल्ड कप ५ वेळा जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने १९९९ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा वन डे वर्ल्ड कप जिंकला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक करणारा एकमेव संघ होण्याचा मान ऑस्ट्रेलियाने मिळवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी