CWG 2022: दोन बॉक्सरने पटकावलं सुवर्णपदक, कॉमनवेल्थमध्ये भारताचा दबदबा

Commonwealth Games 2022: नीतूने कॉमनवेल्थ गेम्समध्‍ये पदार्पणात खूप आत्मविश्वास दाखवला आणि फायनलमध्‍ये ती मागील सामन्यांप्रमाणेच खेळली.

 amit panghal neetu ganghas dominate in cwg 2022 both boxers won gold
दोन बॉक्सरने पटकावलं सुवर्णपदक, कॉमनवेल्थमध्ये भारताचा दबदबा 
थोडं पण कामाचं
  • अमित पंघाल-नीतू गंघास या दोघांनी त्यांच्या अंतिम सामन्यात यजमान देश इंग्लंडच्या बॉक्सरचा केला पराभव
  • पंघालने कियारानचा 5-0 असा केला पराभव
  • नीतूने कांस्यपदक विजेत्या रेस्झटान डेमी जेडचा 5-0 असा केला पराभव

CWG 2022: भारतीय बॉक्सर अमित पंघाल (Amit anghal) आणि नीतू गंघास (neetu ganghas)यांनी रविवारी (७ ऑगस्ट २०२२) सुवर्णपदकासह राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) आपले वर्चस्व कायम ठेवले. या दोन्ही बॉक्सर्सनी त्यांच्या अंतिम सामन्यात यजमान देश इंग्लंडच्या बॉक्सरचा पराभव केला. पंघालने पुरुषांच्या फ्लायवेट (48-51 किलो) गटात युरोपियन चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेत्या मॅकडोनाल्ड किरनचा 5-0 असा पराभव केला. (amit panghal neetu ganghas dominate in cwg 2022 both boxers won gold)

सगळ्यात आधी रिंगमध्ये उतरलेल्या नीतूने महिलांच्या किमान वजनी (45-48 किलो) गटाच्या अंतिम फेरीत जागतिक चॅम्पियनशिप 2019 कांस्यपदक विजेत्या रेझाटन डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला.

जागतिक चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पंघालने लहान उंची असूनही जबरदस्त कामगिरी केली.

अधिक वाचा: कुस्तीमध्ये गोल्डचा षटकार, नवीनने पाकिस्तानी कुस्तीपटूला हरवून जिंकले सुवर्णपदक

तर नीतूने तिच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पणातच प्रचंड आत्मविश्वास दाखवला आणि तिने मागील सामन्यांमध्ये खेळल्याप्रमाणेच अंतिम फेरीतही लढत दिली.

तिने तीनही फेऱ्यांमध्ये पूर्ण नऊ मिनिटे नियंत्रण राखले आणि विरोधी बॉक्सरला कोणतीही संधी दिली नाही. नीतूने धारदार, अचूक ठोसे मारून प्रतिस्पर्ध्याला अक्षरश: नामोहरम केले.

अधिक वाचा: 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये बीडच्या सुपूत्राची धाव, अविनाश साबळेने जिंकले रौप्यपदक

पंतप्रधान मोदींनी पदक विजेत्यांचे केले अभिनंदन

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अनेक पदके जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीय खेळाडूंच्या प्रयत्नांचे कौतुक केले. भारतीय कुस्तीपटू पूजा गेहलोतचा लोकांची माफी मागणारा व्हिडिओ टॅग करत मोदी म्हणाले, 'पूजा, तुझे पदक एक सेलिब्रेशन असले पाहिजे, माफी नाही,' असे मोदींनी महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सांगितले.

अधिक वाचा: CWG 2022: दोन बॉक्सरने पटकावलं सुवर्णपदक, कॉमनवेल्थमध्ये भारताचा दबदबा

ते पुढे म्हणाले, 'तुमचा जीवन प्रवास आम्हाला प्रेरणा देतो, तुमचे यश आम्हाला आनंदी करते. तुमच्या नशिबात अनेक अद्भुत गोष्टी आहेत.... चमकत राहा!' कांस्य पदक जिंकल्याबद्दल मोदींनी कुस्तीपटू पूजा सिहागचे कौतुक केले आणि तिने एक प्रतिभावान कुस्तीपटू म्हणून आपला ठसा उमटवला असल्याचे सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, 'तिच्या कधीही पराभूत न होण्याच्या वृत्तीमुळे तिने अनेक आव्हानांचा सामना केला आहे. तिने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे, तिचे अभिनंदन. मला खात्री आहे की ती यापुढील काळातही भारताची मान उंचावत राहील.'

कांस्यपदक विजेता कुस्तीपटू दीपक नेहराचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, त्यांनी उल्लेखनीय धैर्य आणि वचनबद्धता दाखवली. 'त्यांना त्यांच्या आगामी स्पर्धेसाठी माझ्या शुभेच्छा,' असे पंतप्रधान म्हणाले. महिला एकेरी पॅरा टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मोदींनी भाविना पटेलचेही अभिनंदन केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी