आनंद महिंद्रांनी पूर्ण केले वचन, टी. नटराजनला भेट म्हणून मिळाली 'महिंद्रा थार', नटराजननेही दिले रिटर्न गिफ्ट

महिंद्रा उद्योगसमूहाचे मालक आनंद महिंद्रांनी आपले वचन पाळत टी. नटराजनला महिंद्रा थार गाडी दिली आहे. नटराजनने यासाठी त्यांचे आभार मानले आहेत आणि सोबतच आपली गाबा कसोटीची जर्सी त्यांना भेट दिली आहे.

T. Natarajan
आनंद महिंद्रांनी पूर्ण केले वचन, टी. नटराजनला भेट म्हणून मिळाली 'महिंद्रा थार', नटराजननेही दिले रिटर्न गिफ्ट  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आनंद महिद्रांनी प्रभावित होऊन दिले होते हे वचन
  • नटराजनने ट्वीट करून दिली याबद्दलची माहिती
  • चित्रपटाच्या कहाणीपेक्षा कमी नाही नटराजनचा प्रवास

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) भारताच्या (India) ऐतिहासिक कसोटी विजयात (historical tests win) सर्वात महत्वाची बाब होती ती भारताच्या युवा खेळाडूंचे (young players) प्रदर्शन. भारताने आपल्या बेंच स्ट्रेंथच्या (bench strength) जोरावर सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका (test series) जिंकली होती. विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या कसोटीनंतर भारतात परतला होता. ईशांत शर्मा (Eshant Sharma) या दौऱ्यात नव्हता आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि उमेश यादव (Umesh Yadav) जखमी (injured) होते. ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) झालेल्या अंतिम कसोटीत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रविचंद्रन अश्विनही (Ravichandran Ashwin) नव्हते. पण टीमच्या अननुभवी खेळाडूंनी (inexperienced players) भारताला विजय मिळवून दिला.

आनंद महिद्रांनी प्रभावित होऊन दिले होते हे वचन

भारताच्या संघाच्या या विजयामुळे अनेकजण प्रभावित झाले होते. यात महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचाही समावेश आहे. त्यांनी गाबामधील ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराज, टी. नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना महिंद्रा थार भेट म्हणून देण्याची घोषणा केली होती आणि आज नटराजनला त्याची थार गाडी मिळाली.

नटराजनने ट्वीट करून दिली याबद्दलची माहिती

टी. नटराजनने ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे, 'भारतासाठी क्रिकेट खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण आहे. या रस्त्यावर पुढे जाणे माझ्यासाठी फार वेगळे होते. या प्रवासात मला जे प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे त्यासाठी मी ऋणी आहे. उत्तम लोकांचे समर्थन आणि प्रोत्साहनामुळे मला पुढे जाण्यात मदत मिळाली आहे.' पुढच्या ट्वीटमध्ये त्याने म्हटले आहे, 'मी आज शानदार महिंद्रा थार चालवत घरी आलो आहे. मी श्री. आनंद महिंद्रा यांचे आभार मानतो. ज्यांनी माझा प्रवास ओळखला आणि मला हुरूप दिला. क्रिकेटसाठीचे आपले प्रेम फार मोठे आहे सर. मी आपल्याला गाबा कसोटीत वापरलेला माझा शर्ट स्वाक्षरी करून देतो आहे.’

चित्रपटाच्या कहाणीपेक्षा कमी नाही नटराजनचा प्रवास

टी. नटराजनचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कहाणीपेक्षा कमी नाही. एका छोट्याशा झोपडीतून सुरू झालेला नटराजनचा प्रवास भारतीय क्रिकेट संघापर्यंत पोहोचला आहे. या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाने नुकत्याच इंग्लंडविरोधातल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही शेवटच्या षटकात नेमके यॉर्कर्स टाकत भारताला विजय मिळवून दिला. याआधी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने यात तिन्ही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि सर्वांच्याच मनात स्थान मिळवले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी