Andrew Symonds Death : ऑस्ट्रेलियाने गमावला अजून एक क्रिकेटर, ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा अपघातात मृत्यू

ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर (all-rounder) माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) कार अपघातात (Car accident) मृत्यू झाला आहे.

Former cricketer Andrew Symonds dies in car accident
माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
  • टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात

Andrew Symonds Death in Car Accident : नवी दिल्ली :  ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर (all-rounder) माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) कार अपघातात (Car accident) मृत्यू झाला आहे.ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे. 

अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचंही निधन झालं. एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी अँड्र्यू सायमंड्सला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण डॉक्टरांना त्यामध्ये अपयश आलं. या अपघातात सायमंडला गंभीर दुखापत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सर्व प्रयत्न करूनही अँड्र्यूला वाचवता आलं नाही.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. एका एजन्सीनुसार, क्वीन्सलँड पोलिसांनी सांगितलं आहे की, टाऊन्सविले शहराच्या पश्चिमेला सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये रात्री 10:30 वाजता एक अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात भरधाव वेगात असलेली कार उलटल्याचं समोर आलं आहे. अपघातावेळी अँड्र्यू सायमंड्स एकटाच गाडीत होता. 

सायमंड्सच्या कुटुंबीय आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. क्रिकेट विश्वात तसेच इतर स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यामध्ये थायलंडमध्ये सुट्टीवर असताना शेन वॉर्नचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. आता त्याच्या काही आठवड्यांनंतरच क्रीडा जगताला दुसरा मोठा धक्का बसला आहे. सायमंड्सची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट शेन वॉर्नला श्रद्धांजली देणारी होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी