अजिंक्य रहाणेची साडेसाती काही संपेना, आयपीएलपाठोपाठ इंग्लंडच्या दौऱ्यातूनही होणार आऊट

अजिंक्य रहाणेसोबत त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अजिंक्य आता आयपीएलमधील उर्वरीत सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अजिंक्य आयपीएल पाठोपाठ आता इंग्लंडच्या दौऱ्यातूनही आऊट होऊ शकतो, असे दिसत आहे.

Anjinkya Rahane will be out of the tour of England
आयपीएलपाठोपाठ इंग्लंडच्या दौऱ्यातूनही अजिंक्य होणार आऊट  
थोडं पण कामाचं
  • आयपीएलमध्ये अजिंक्य राहणे अपयशी ठरला.
  • आयपीएल पाठोपाठ आता इंग्लंडच्या दौऱ्यातूनही आऊट
  • दुखापतीमुळे अजिंक्य इंग्लंड दौऱ्यातून बाहेर जाण्याची शक्यता

Anjinkya Rahane : मुंबई : अजिंक्य रहाणेसोबत त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अजिंक्य आता आयपीएलमधील उर्वरीत सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अजिंक्य आयपीएल पाठोपाठ आता इंग्लंडच्या दौऱ्यातूनही आऊट होऊ शकतो, असे दिसत आहे. अजिंक्य रहाणे आयपीएलपूर्वी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात नव्हता. भारताच्या निवड समितीने त्याला डच्चू दिला होता. पण त्यानंतर अजिंक्यसाठी आयपीएलच्या लिलावात एक आनंदाची बातमी आली होती. केकेआरच्या संघाने अजिंक्यला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.

अजिंक्यने पहिल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. पण त्यानंतर सातत्याने तो अपयशी ठरला. पण आता तर अजिंक्य आयपीएलमधूनही बाहेर गेला आहे. कारण आयपीएलमध्ये खेळत असताना अजिंक्यला गंभीर दुखापत झाली आहे. अजिंक्यचे स्नायू दुखावले गेले आहेत. त्यामुळे आता अजिंक्यला बऱ्याच कालावधीसाठी विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांमधूनही तो दूर गेला.  दरम्यान, ही दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे अजिंक्य आता इंग्लंडच्या दौऱ्यावरही जाऊ शकणार नाही, असे समोर येत आहे.

अजिंक्य हा सध्याच्या घडीला फक्त भारताच्या कसोटी संघातच आहे. आयपीएलनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. त्यानंतर भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. गेल्यावेळी जेव्हा इंग्लंडमध्ये भारताचा संघ दाखल झाला होता, तेव्हा कोरोनामुळे अखेरचा सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे हा सामना यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यात खेळविण्यात येणार आहे.

अजिंक्य रहाणेच्या यावर्षीच्या आयपीएलचा विचार केला तर त्याला जास्त चमक दाखवता आली नाही. केकेआर आतापर्यंत 13 सामने खेळला, त्यापैकी अजिंक्यला 7 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. या सात सामन्यांमध्ये अजिंक्यला 133 धावाच करता आल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी