IPL 2020 चं पूर्ण शेड्यूल, 'या' दिवशी असेल फायनल 

IPL 2020 full schedule announced: बीसीसीआयनं मंगळवारी अधिकृत आयपीएल 2020 च्या कार्यक्रमाची घोषणा केली. यावेळी टूर्नामेंटचा कालावधी 57 दिवसांचा असेल. 

IPL 2020
IPL 2020 चं पूर्ण शेड्यूल, 'या' दिवशी असेल फायनल  

मुंबईः आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं मंगळवारी आयपीएलच्या 13 व्या सिझनच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहाद्वारे जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या लीगची सुरूवात 29 मार्चला डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. हा लीग 17 मे रोजीपर्यंत चालेल. फायनल मॅच 24 मे रोजी खेळवण्यात येईल. 

प्ले ऑफचा कार्यक्रम आतापर्यंत घोषित करण्यात आलेला नाही आहे. तसंच 24 मे रोजी फायनल कोणत्या वेन्यूवर खेळला जाईल याबद्दलचीही माहिती दिली नाही आहे. पहिल्यांदा पूर्ण सिझनदरम्यान केवळ 6 मॅच दुपारी खेळवण्यात येतील. डबल हेडर केवळ रविवारी खेळले जातील. टूर्नामेंट 57 दिवस चालेल. 

राजस्थान रॉयल्स सोडून अन्य सर्व टीम यावेळी मॅच आपल्या घरगुती मैदानावर खेळतील. राजस्थान आपले 8 घरगुती मॅचपैकी 2 गुवाहाटीमध्ये खेळण्याची शक्यता आहे. ही मॅच 9 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध 13 एप्रिलला कोलकात्ता नाइट रायडर्सविरूद्ध खेळण्यात येतील. सध्या या दोन मॅच गुवाहाटीमध्ये खेळण्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. 

येथे बघा कसं असेल IPL 2020 full schedule

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी