Sourav Ganguly News । मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मागील एक दिवसापासून सलग अनेक ट्विट करून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. सर्वप्रथम त्यांच्या पहिल्या ट्विटने खळबळ उडाली होती जिथे त्यांनी जीवनाच्या नवीन अध्यायात लोकांचा पाठिंबा मागितला होता. त्यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती, त्या चर्चेला बोर्डाचे सचिव जय शाह यांनी पूर्णविराम दिला होता. यानंतर ते एक शैक्षणिक ॲप लॉन्च करणार असल्याचे समोर आले. पण त्यांनी गुरूवारी आणखी एक पोस्ट करून आपला खरा हेतू सांगितला आहे. (Another post trending of Sourav Ganguly, stated the real purpose behind the previous post).
गुरुवारी सकाळी सौरव गांगुली यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, "आपल्यामधील भारताच्या पहिल्या अनावरणाचा खुलासा १२ वाजता होईल, आणि हे कोणते शैक्षणिक ॲप नाही, यानंतर १२ वाजता दादांनी ते काय बोलत होते याचा खुलासा केला. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.
अधिक वाचा : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटीव्ह
सौरव गांगुली यांनी आपल्या ताज्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आयपीएलने अनेक खेळाडू घडवले आहेत, परंतु या खेळाडूंना यश मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकांचे योगदान हे त्याहून अधिक प्रेरणादायी आहे. दादांनी लिहिले की, त्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षक, शिक्षण, ते कोणत्याही क्षेत्रातील असोत, त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्यासाठी ते एका मोहिमेत सहभागी होत आहेत. अशी पोस्ट करून दादांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सौरव गांगुलींच्या बुधवारच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, सौरव बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही. अशा स्थितीत बीसीसीआयची कमान दादांच्या हाती राहणार हे स्पष्ट झाले आहे. अलीकडेच, कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गृहमंत्री अमित शहा यांनीही सौरवची भेट घेतली. यादरम्यान गृहमंत्री सौरवच्या घरी पोहोचले होते आणि दोघांनी तिथे एकत्र जेवण केले होते. यादरम्यान सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपचे अनेक नेतेही डिनरला उपस्थित होते.