या वर्षीच 'या' महिन्यात होऊ शकतात आयपीएलचे सामने, दिग्गज खेळाडूचे मत

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 22, 2020 | 09:54 IST | टाइम्स नाऊ हिंदी

या वर्षीचा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक जर रद्द करण्यात आला तर ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास आयपीएल मालिका खेळवता येऊ शकते असे मत अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केले आहे

Anshuman Gaikwad Spoke about 2020 IPL Series cricket news in marathi
या वर्षीच 'या' महिन्यात होऊ शकतात आयपीएलचे सामने, दिग्गज खेळाडूचे मत  

थोडं पण कामाचं

  • 'टी-२० विश्वचषक रद्द झाला तर या वर्षीचे आयपीएल होऊ शकते'
  • ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास सामने खेळवता येऊ शकतात
  • भारताचे माजी क्रिकेट खेळाडू अंशुमन गायकवाड यांचे मत

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड यांच्या मते २०२० या वर्षीचे आयपीएलचे सामने हे ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात खेळवता येऊ शकतात. याच काळात होणारा ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक रद्द करण्यात आला तर आयपीएलचे सामने होऊ शकतात. या वेळी टी-२० विश्व चषक आयोजित करण्याची संधी ही ऑस्ट्रेलियाला मिळाली आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या जागतिक फैलावामुळे ही स्पर्धा होण्याची कमी शक्यता आहे. 

यापूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मार्क टेलरने या बाबतीत भाष्य करताना म्हटले होते की, ज्या प्रकारे जगातील सर्व देशांकडून आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे, ते पाहत टी-२० विश्वचषकाचे आयोजन अत्यंत अवघड होणार आहे. मागील काही महिन्यात जगभरात ज्या प्रकारे कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम झालेले एकही क्षेत्र नाही. 

भारतीय क्रिकेट संघासाठी ४० टेस्ट आणि १५ वनडे सामने खेळणाऱ्या अंशुमन गायकवाड यांनी या वर्षीच्या आयपीएल आयोजनात जास्त रस दाखवला नव्हता. कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे आयपीएल २०२० स्पर्धेला अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आले आहे. जर यंदाचे आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर ऑक्टोबर-नोव्हेंबरचा काळ योग्य राहील असे अंशुमन गायकवाड म्हणाले. अंशुमन गायकवाड यांचा जन्म मुंबईत झाला होता. तर राष्ट्रीय स्तरावर खेळताना त्यांनी बडोदा संघाचे प्रतिनिधीत्त्व केले होते.  

'टी-२० विश्वचषक रद्द करण्यात यावा'

कोरोना व्हायरसच्या जगभरातील फैलावामुळे ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक होण्याची शक्यता आधीच मावळली आहे. जर हा विश्वचषक रद्द झाला तर त्याऐवजी भारतात होणारी आयपीएल स्पर्धा होऊ शकते. पण त्यावेळी भारतातील परिस्थिती कशी असेल यावरच आयपीएलचे भवितव्य अवलंबून असेल. असे अंशुमन गायकवाड म्हणाले. 

गायकवाड पुढे असेही म्हणाले की, क्रिकेटचा खेळ आता पूर्वीसारखा राहिला नाही. पूर्वी ज्याप्रकारे क्रिकेट खेळल्या जायचे त्यात आता फार मोठा बदल झाला आहे. सोशल डिस्टंसिंगमुळे स्टेडिअममध्ये लोक येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे किंवा सरकार प्रेक्षकांविना सामने खेळण्यास सांगू शकते. त्यामुळे आता क्रिकेट खेळाडूंना विना प्रेक्षक खेळण्याची सवय लावून घ्यावी लागेल. ही बाब क्रिकेट खेळाडूंसाठी सोपी नक्कीच नसेल कारण खेळाडूंना प्रेक्षकांच्या गर्दीत सामने खेळण्याची सवय आहे.  या प्रकारे क्रिकेट खेळणे हा खेळाडूंसाठी नक्कीच नवीन अनुभव असेल. 

जगभरातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता अंशुमन गायकवाड म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट सुरु व्हायला अजून किमान चार महिन्याचा कालावधी लागू शकतो. क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू चमकावण्यासाठी आणि अधिक ग्रीप येण्यासाठी  गोलंदाज थुंकीचा वापर करायचे, आता आयसीसी क्रीडा समितीच्या निर्देशांनुसार असे करता येणार नाही. चेंडूला थुंकी लावण्यास आता आयसीसीकडून बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक जलदगती गोलंदाजाची चिंता वाढली आहे.     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी