Asia cup 2022: आशिया कपमध्ये विराट कोहलीला करणार माय-लेक चिअर; विराट, अनुष्का दुबईसाठी रवाना सोबतीला आहे रोहितही

आशिया कप (Asia cup) टी 20 स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ (Indian team) आज सकाळी दुबईला रवाना झाला. रोहित शर्मा, (Rohit sharma) विराट कोहली (Virat kohli) त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि अन्य सदस्यांचे दुबईला (Dubai) रवाना होत असतानाचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी संघ दुबईत दाखल झाला आहे. 

Anushka And Daughter will cheer to Virat Kohli in the Asia Cup;
आशिया कपमध्ये विराट कोहलीला माय-लेक करणार चिअर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तब्बल 41 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर कोहलीचं भारतीय संघात पुनरागमन
  • विराट कोहलीसाठी हा आशिया चषक खूप महत्त्वाचा
  • कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 99 सामने खेळले आहेत.

मुंबई: आशिया कप (Asia cup) टी 20 स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ (Indian team) आज सकाळी दुबईला रवाना झाला. रोहित शर्मा, (Rohit sharma) विराट कोहली (Virat kohli) त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि अन्य सदस्यांचे दुबईला (Dubai) रवाना होत असतानाचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी संघ दुबईत दाखल झाला आहे. 

विराट कोहलीला आशिया चषक खूप महत्त्वाचा

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्या दरम्यान तब्बल 41 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करत आहे. आशिया कपमध्ये तो मैदानात उतरताना दिसणार आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. विराट कोहलीसाठी हा आशिया चषक खूप महत्त्वाचा आहे. जवळपास महिनाभरानंतर पुनरागमन करणाऱ्या कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Also : नुपूर शर्मांचा जीव घेणार होता IS सुसाईड बॉम्बर

कोहलीला आशिय कपमध्ये आपली पत्नी अनुष्का आणि लेकीची साथ मिळणार आहे. दोघांच्या पाठिंब्याने आणि चिअरने कोहलीचा आत्मविश्वास वाढेल यात शंका नाही.  ब्रेकपूर्वी कोहली खूप संघर्ष करत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 विश्वचषकापूर्वी त्याच्यासाठी आशिया चषक खूप महत्त्वाचा आहे. कोहलीने आयपीएलच्या 16 सामन्यात केवळ 341 धावा केल्या होत्या. जे त्याचे वाईट रूप दर्शवते. तो परत येण्यास उत्सुक असेल. 

MCA च्या इंडोर अकादमीत प्रॅक्टिस

वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथी MCA इंडोर अकादमीत कोहलीने सराव केलाय. आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होतेय. ही स्पर्धा 11 सप्टेंबरपर्यंत चालेल. पहिला सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये होईल. दुसऱ्या सामन्यात 28 ऑगस्टला भारत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळेल. ब्रेकनंतर विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. आशिया कप मध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे.

Read Also : ईडीची पीडा दूर होण्यासाठी जॅकलिन देवाच्या दारी

टीम इंडिया बदला घेणार की पाकिस्तानाचा असणार दबदबा

सर्वांनाच उत्सुकता असलेला भारतविरुद्ध पाकिस्तानचा सामना 28 ऑगस्टला होणार आहे. पाकिस्तानी संघ नेदरलँडवरुन दुबईमध्ये दाखल झाला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघ 3 दिवस दुबईमध्ये ट्रेनिंग करणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेआधी आशिया कपच्या माध्यमातून भारताला पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची संधी मिळत आहे. मागच्यावर्षी दुबईत झालेल्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी पाकिस्तानने भारतावर 10 विकेट राखून एकतर्फी विजय मिळवला होता. भारतीय संघ या पराभवाचा हिशोब चुकता करण्यासाठी उत्सुक्त आहे. 

विराट कोहलीचा होणार विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टेस्ट, वनडे आणि टी20 सामन्यात 100-100 सामने खेळणारा तो आशियातील पहिला आणि जगातील दुसरा क्रिकेटपटू बनणार आहे. कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 99 सामने खेळले आहेत. जर त्याला पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाली तर हा त्याचा 100 वा टी-20 सामना असेल. अशाप्रकारे तो टेस्ट, वनडे प्रमाणे 100 टी20 सामना खेळून मोठा रेकॉर्ड करणार आहे.

Read Also : पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून स्वप्ना पाटकर यांना समन्स

आशिया कपमधील संघ असेल टी 20 वर्ल्ड कपमध्ये 

भारतीय संघ दुबईला रवाना होत असतानाच, टीम इंडियासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या दुबईला जाण्याबद्दल साशंकता आहे. या परिस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाच्या हेड कोचची जबाबदारी संभाळू शकतात. आशिया कपमध्ये खेळणारा संघच ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कपमध्ये दिसू शकतो. वर्ल्ड कपच्या दृष्टीने भारताचा 80 ते 90 टक्के संघ तयार आहे, असं विधान कॅप्टन रोहित शर्माने केलं होतं.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी