वनडे चॅलेंजर ट्रॉफी: अनुष्का शर्माने केली ५२ धावांची खेळी, पाच विकेट मिळवल्या

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 03, 2021 | 17:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

अनुष्का शर्माने ५२ धावा करण्यासोबतच पाच विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. बीसीसीआय विमेनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती देण्यात आली. 

anushka sharma
अनुष्का शर्माची ५२ धावांची खेळी, मीम्स झाले व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआयच्या या ट्वीटमध्ये ज्या अनुष्का शर्माचा उल्लेख करण्यात आला होता ती इंडिया बी संघाची कर्णधार आहे.
  • अनुष्का शर्मा बी संघाची कर्णधार आहे. तिने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ५२ धावा केल्या आणि पाच विकेट मिळवल्या.
  • सोबतच आपल्या संघाला ९२ धावांनी विजय मिळवून दिला. 

मुंबई: बीसीसीआय विमेने(bcci women) एक ट्वीट(tweet) सध्या सोशल मीडियावर(social media) चांगलेच व्हायरल होत आहे. यात सांगितले आहे की अनुष्का शर्माने(anushka sharma) ५२ धावांची खेळी केली. सोशल मीडियावर लोक याला विराटची पत्नी(virat wife) अनुष्का शर्माशी जोडून खिल्ली उडवत आहेत. बीसीसीआय विमेनने अंडर १९ वनडे चॅलेंजर ट्रॉफी २०२१-२२च्या एका सामन्याचे अपडेट शेअर केले होते. लोकांनी याचा संबध विराटची पत्नी अनुष्का शर्माशी लावला. हे ट्वीट खूप शेअर केले जात आहे. Anushka Sharma 52 runs in 88 balls 

बीसीसीआयच्या या ट्वीटमध्ये ज्या अनुष्का शर्माचा उल्लेख करण्यात आला होता ती इंडिया बी संघाची कर्णधार आहे. अंडर १९ वनडे चॅलेंजर ट्रॉफीमध्ये सर्व खेळाडूंना चार संघात वाटण्यात आले. टीमए, टीम बी, टीम सी आणि टीम डी. तर अनुष्का शर्मा बी संघाची कर्णधार आहे. तिने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ५२ धावा केल्या आणि पाच विकेट मिळवल्या. सोबतच आपल्या संघाला ९२ धावांनी विजय मिळवून दिला. 

बीसीसीआयच्या या ट्विटनंतर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी