Chakda Xpress: या दिग्गज महिला क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये दिसणार अनुष्का शर्मा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 06, 2022 | 15:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Anushka Sharma Chakda Xpress Movie: अनुष्का शर्माच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. याचे नाव चकदा एक्सप्रेस असे आहे. सिनेमात ती एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

jhulan goswami and anushka sharma
या दिग्गज महिला क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये दिसणार अनुष्का 
थोडं पण कामाचं
  • अनुष्का शर्मा दिसणार चकदा एक्सप्रेसमध्ये 
  • अनुष्का तीन वर्षानंतर कमबॅक करत आहे.
  • चकदा एक्सप्रेस हा सिनेमा झूलन गोस्वामीचा बायोपिक आहे. 

मुंबई: क्रीडा जगतात अशा अनेक खेळाडूंची एंट्री होते मात्र यश हे प्रत्येकाच्याच नशीबात नसते. असे फार कमी खेळाडू असतात जे यशाच्या शिखरावर पोहोचतात. तर त्यातील काही निवडक खेळाडू असे असतात त्यांच्या जीवनावर आणि करिअरवर आधारित बायोपिक बनतात. भारतातील अनेक पुरुष क्रिकेटर्सचे आयुष्य पडद्यावर दाखवले आहे. मात्र पहिल्यांदा एखाद्या महिला क्रिकेटच्या जीवनावर आधारित बायोपिक(biopic) येत आहे. ही महिला खेळाडू इतर कोणी नसून भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी(jhulan goswami) आहे. झूलनच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा(anushka sharma) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे नाव चकदा एक्सप्रेस(chakda express) आहे. anushka sharma will be in lead role of chakda express

३४० आंतरराष्ट्रीय विकेट

३९ वर्षीय झूलनने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात २००२मध्ये केली होती. तिने गेल्या २० वर्षात क्रिकेटच्या दुनियेत आपली जबरदस्त छाप सोडली आहे. तसेच आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. तिने आतापर्यंत ३४० आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. झूलनने वनडेमध्ये २४०, टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ५६ तर कसोटी क्रिकेटमध्ये ४४ विकेट घेतल्या आहेत. ती महिला वनडे क्रिकेट इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. ती २००० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय ओव्हर टाकणारी एकमेव महिला बॉलर आहे. तिने भारताच्या संघाचे नेतृत्वही केले होते. २०१०मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्येही तिने भारताचे नेतृत्व केले होते आणि संघाला सेमीफायनलपर्यंत पोहोचवले होते. 

कुटुंबाची नव्हती इच्छा

झूलनचा जन्म २५ नोव्हेंबर १९८२मध्ये पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील चकदा गावात झाला. तिचे क्रिकेटर बनण्याचे लहानपणापासूनच स्वप्न होते. झ१९९२मध्ये तिला क्रिकेटर बनण्याची प्रबळ इच्छा झाली. तिने वयाच्या १२व्या वर्षी क्रिकेट वर्ल्डकप पाहिला होता. झूलनचे आई-वडील सुरूवातीला यासाठी तयार नव्हते. तसेच त्यावेळेस देशात महिला क्रिकेटची खास ओळखही नव्हती. 

रोजचा ८० किमीचा प्रवास

झूलनने क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्णकरण्यास प्रचंड मेहनत घेतली आहे. तिने क्रिकेटचे बारकावे शिकण्यासाठी दररोज ८० किमी दूर जावे लागत असे. हा प्रवास ती लोकल ट्रेनने करायची. ती सकाळी चार वाजताच्या ट्रेनने ट्रेनिंगसाठी कोलकाता जात होती. बराच संघर्ष केल्यानंतर तिने हे यशाचे शिखर गाठले आहे. झूलन एकेकाळी जगातील सर्वात वेगवान महिला गोलंदाज होती. ती १२० किमी प्रतितासाच्या वेगाने चेंडू टाकत होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी