Diego Maradona: महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे निधन 

Diego Maradona passes away: फुटबॉल विश्वातील मोठे नाव असलेले अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. 

Diego Maradona
डिएगो मॅराडोना  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे निधन
  • वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

अर्जेंटिनाचे (Argentina) महान फुटबॉलपटू आणि वर्ल्ड कप विजेता डिएगो मॅराडोना (legend Diego Maradona) यांचे बुधवारी निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. नुकतीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यावर ११ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज सुद्दा मिळाला होता. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर आज (२५ नोव्हेंबर २०२०) त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. 

११९८६ मध्ये आपल्या जबरदस्त खेळीने डिएगो मॅराडोना यांनी अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकवून दिला. डिएगो मॅराडोना हे फुटबॉल विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त नावांपैकी एक होते. त्यांनी अर्जेंटिना फुटबॉल टीमसाठी मॅचेस खेळल्या आणि त्यानंतर प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले.

गरीब कुटुंबात जन्म 

डिएगो मॅराडोना यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९६० रोजी अर्जेंटिना येथे झाला. अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांना चार बहिणी, दोन भाऊ आहेत. चार बहिणींनंतर कुटुंबातील ते पहिले पूत्र होते. त्यांना दोन लहान भाऊ आहेत.

वयाच्या आठव्या वर्षी डिएगो मॅराडोना यांचा खेळ सर्वप्रथम त्यांच्या घराजवळील स्थानिक फुटबॉल क्लब एस्ट्रेला रोजा येथील टॅलेंट स्काऊटने पाहिला. त्यानंतर ते स्थानिक टीमचे सदस्य बनले आणि त्यानंतर ब्यूनो आयर्सच्या अर्जेंटिनोस ज्युनिअर्स क्लबच्या ज्युनिअर संघात त्यांनी स्थान मिळवले.

डिएगो मॅराडोना यांनी अर्जेंटिनासाठी ९१ मॅचेस खेळत ३४ गोल्स केले होते आणि चार वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी मैदानात असे काही प्रदर्शन, गोल्स केले जे आजही सर्वांच्या लक्षात आहेत. अनेक गोल्स असे केले जे पाहून सर्वंच आश्चर्यचकित झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी