Arjun and Sara Tendulkar: अर्जुन-सारा तेंडुलकर बनले मुन्नाभाई-सर्किट, पाहा त्यांचे फोटोज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 22, 2022 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

sara tendulkar: सारा लंडन आणि मुंबईत आपल्या कुटुंबासह राहते. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह राहते. यावेळेसही तिने आपले काही व्हिडिओज आणि फोटोज शेअर केले आहेत.

sara tendulkar
अर्जुन-सारा तेंडुलकर बनले मुन्नाभाई-सर्किट, पाहा फोटोज  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सारा लंडन आणि मुंबईत आपल्या कुटुंबासह राहते.
  • सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह राहते.
  • यावेळेसही तिने आपले काही व्हिडिओज आणि फोटोज शेअर केले आहेत.

मुंबई: भारताचा दिग्गज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची(india former cricketer sachin tendulkar daughter sara tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडिया(social media) सेन्सेशन आहे. ती सातत्याने फिरत असते. जयपूर, गोवा आणि थायलंडनंतर आता सार लंडनला पोहोचली आहे. दरम्यान साराने लंडनमध्ये(london) आपले शिक्षण घेतले आहे. 

अधिक वाचा - अर्जुन कपूर मलायका अरोरापासून दूर,अंशुलानं पेपरवर केली सही

सारा लंडन आणि मुंबईत आपल्या कुटुंबासह राहते. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह राहते. यावेळेसही तिने आपले काही व्हिडिओज आणि फोटोज शेअर केले आहेत. यात तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरही दिसत आहे. साराने इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओज शेअर केले आहेत. त्यात ती आपला भाऊ अर्जुन तेंडुलकरसह दिसत आहे. तिने त्याच्यासोबत लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरही केले. लंडनमध्ये दोघे भाऊ-बहीण एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. 

सारा तेंडुलकरने अर्जुन तेंडुलकरसोबत एक फोटो शेअर केला आहे यात तो मुन्नाभाई एमबीबीएसचा मुन्नाभाई आणि सर्किट बनलेला दिसत आहे. या फोटोत खाली मुन्ना भाई आणि सर्किट दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की सारा तेंडुलकर सर्किट बनली आहे आणि अर्जुन मुन्ना भाई बनला आहे. सारा तेंडुलकरने या फोटोच्या खाली मुन्नाभाई आणि सर्किटचा फोटोही लावला आहे. सारा आणि अर्जुनचे कपडेही हुबेहूब मुन्नाभाई आणि सर्किटप्रमाणे मॅचिंग आहेत. 

अधिक वाचा - ट्रिपल मर्डरने खळबळ; महिला कॉन्स्टेबलसह दोघांची हत्या

सारा तेंडुलकर सातत्याने आपले फोटोशूट आणि जाहिरात शूट करत असते. याचे व्हिडिओज जसेच फोटोजही शेअर करत असते. रिपोर्ट्सनुसार सारा बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे. दरम्यान, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. तर दुसरीकडे गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत आयपीएल आणि टीम इंडियासाठी पदार्पण केलेले ननाही. अर्जुनल आयपीएलमध्ये मुंबई फ्रेंचायझीने दोन वेळा खरेदी केले मात्र अद्याप अर्जुनला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. 

काही दिवसांपूर्वी सारा एकदम मराठमोळ्या लूकमध्ये दिसली होती. एका लग्नासाठी तिने असा लूक कॅरी केला होता. तीने केसाचा अंबोडा बांधून त्यावर गजरा लावला होता. साडी नेसली होती. नाकात नथ होती. कपाळावर चंद्रकोर शोभून दिसत होती. तिला पहिल्यांदा अशा लूकमध्ये पाहिले गेले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी