Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा मुंबईच्या रणजी संघात प्रवेश, पृथ्वी शॉकडे नेतृत्व

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 30, 2021 | 12:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sachin Tendulkar Son Arjun In Ranji Mumbai squad: भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या रणजी संघात स्थान देण्यात आले आहे. या संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉ करत आहे. 

arjun tendulkar
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा या रणजी संघात प्रवेश 
थोडं पण कामाचं
  • अर्जुन तेंडुलकरची मुंबई्च्या रणजी संघात निवड
  • पृ्थ्वी शॉ करणार मुंबईचे नेतृत्व
  • मुंबईचा पहिला सामना महाराष्ट्राशी

मुंबई: क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची(sachin tendulkar son arjun tendulkar) मुंबईच्या रणजी संघात(mumbai ranji team) निवड करण्यात आली आहे. तो १३ जानेवारीला महाराष्ट्रविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यातून रणजीमध्ये फर्स्ट क्लास पदार्पण करू शकतो या संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉ(prithvi shaw) करणार आहे. तो सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये मुंबईचे नेतृत्व करत आहे. मुंबईने आतापर्यंत ४१वेळा रणजीचे जेतेपद जिंकले आह. यावेळेस मुंबईला नऊ संघाच्या एलीट ग्रुप सीमध्ये ठेवले आहे. Arjun Tendulkar entry in Mumbai Ranji team

अर्जुन तेंडुलकर हा वेगवान गोलंदाज ऑलराऊंडर आहे. या वेळी फेब्रुवारीमध्ये जेव्हा इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामासाठी लिलाव झाला होता तेव्हा शेवटचे नाव अर्जुनचे होते. पहिल्यांदा आयपीएलच्या लिलावात सामील झालेल्या अर्जुनला मुंबई इंडियन्सने बेस प्राईज २० लाखांना खरेदी केले होते. दरम्यान, तो आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकला नाही आणि दुखापतीमुळे त्याला मध्येच ही स्पर्धा सोडावी लागली. या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने मुंबईकडून पदार्पण केले होते. 

रणजी स्पर्धेत मुंबईचा संघ १३ नोव्हेंबरपासून आपल्या अभियानाला सुरूवात करत आहे. त्यांचा पहिला सामना महाराष्ट्रविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर ते कोलकातामध्ये २० जानेवारीला दिल्लीचा सामना करतील. युवा सलामीवीर यशस्वी जयसवाल, मध्यक्रमातील फलंदाज सरफराज खान, अरमान जाफर, आकर्षित गोमेल आणि अनुभवी विकेटकीपर आदित्य तारेला २० सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे. 

असा आहे मुंबईचा संघ

पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जायसवाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तारे (विकेटकीपर), हार्दिक तमोर (विकेटकीपर), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोलंकी, शशांक अटारडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिंस बडियानी, सिद्धार्थ राउत, रोयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी