VIDEO : अर्जुन तेंडुलकरच्या वेगवान गोलंदाजीने इंग्लंड फलंदाजी दांडी गुल, व्हिडिओ व्हायरल 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 18, 2019 | 15:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा फलंदाजी नाही तर गोलंदाजी आपले नाव सिद्ध करत आहे. सचिनला वेगवान गोलंदाज व्हायचे होते, पण त्याचे स्वप्न आपल्या वेगवान गोलंदाजीने अर्जुन तेंडुलकर पूर्ण करताना दिसतो आहे. 

arjun tendulkar fastest ball
अर्जुन तेंडुलकरचा काउंटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवाग चेंडू  |  फोटो सौजन्य: Twitter

लंडन :  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. त्याने देशात नाही तर थेट इंग्लंडमध्ये जाऊन आपल्या वेगवान गोलंदाजीने इंग्रजांची दांडी गुल केली आहे.  भारताच्या अंडर १९ संघाचा डावखुरा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये खेळत आहे. एमसीसी यंग क्रिकेटर्स या संघाकडून तो खेळत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडिओने क्रिकेट जगतात आणि सचिनच्या फॅन्सकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने इंग्लंडच्या एका फलंदाजाला काही समजण्याचा आता त्रिफळाचित केले. 

एमसीसी यंग क्रिकेटर्स आणि सरे यांच्यात हा सामना टॉस जिंकून सरेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातील दुसरे षटक टाकण्याची जबाबदारी अर्जुन तेंडुलकरला मिळाली. अर्जुनने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडुवर समोर उभा असलेला इंग्रज फलंदाजा असा काही दांडा उडवला की त्याला समजलेच नाही चेंडू कधी आला आणि त्याचा स्टंपवर जाऊन आदळला. फलंदाज हा चेंडू डिफेन्सिव्हली खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला काहीच कळले नाही. अर्जुनने हा वेगाने टाकलेला चेंडूचा व्हिडिओ लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. आता हा व्हि़डिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

यापूर्वीही अर्जुन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये आपल्या गोलंदाजीची झलक दाखवली होती. अॅशस सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो गेला होता. त्यावेळी इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेरिस्टो याला यॉर्कर टाकून त्याने जायबंदी केली होते. त्यावेळीही अर्जुनचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. सचिन तेंडुलकर याला वेगवान गोलंदाज व्हायचे होते. तो त्यासाठी चेन्नईच्या एमआरएफ पेस अॅकडमीतही गेला होता. पण त्या ठिकाणी त्याची निवड झाली नव्हती. पण आता अर्जुन तेंडुलकरच्या रुपाने सचिन तेंडुलकर आपले स्वप्न पूर्ण करत असल्याचे म्हटले जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO : अर्जुन तेंडुलकरच्या वेगवान गोलंदाजीने इंग्लंड फलंदाजी दांडी गुल, व्हिडिओ व्हायरल  Description: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा फलंदाजी नाही तर गोलंदाजी आपले नाव सिद्ध करत आहे. सचिनला वेगवान गोलंदाज व्हायचे होते, पण त्याचे स्वप्न आपल्या वेगवान गोलंदाजीने अर्जुन तेंडुलकर पूर्ण करताना दिसतो आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola