Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा डबल धमाका, रणजीच्या पदार्पणातच ठोकली सेंच्युरी

Arjun Tendulkar century on Ranji Trophy: अर्जुन तेंडुलकरने आपल्या रणजीच्या पदार्पणात दमदार सेंच्युरी केली आहे.

Arjun Tendulkar hits century on ranji trophy debut
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा डबल धमाका, रणजीच्या पदार्पणातच ठोकली सेंच्युरी 
थोडं पण कामाचं
  • अर्जुन तेंडुलकरने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलंय
  • योगायोग म्हणजे 34 वर्षांपूर्वी डिसेंबर 1988 मध्येच सचिनने रणजी ट्रॉफिच्या पदार्पणात सेंन्च्युरी ठोकली होती

Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केलीय. 23 वर्षाच्या अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातचं सेन्च्युरी मारून वाहवा मिळवली आहे. अर्जुन तेंडुलकर सध्या गोवा टीममधून रणजी ट्रॉफिचं प्रतिनिधित्व करतो. खेळाच्या दुसऱ्या दिवशी राजस्थान विरोधात अर्जुन तेंडुलकरने ही चमकदार कामागिरी केली आहे. (Arjun Tendulkar hits century on ranji trophy debut cricket news in marathi)

अर्जुन तेंडुलकरने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलंय. योगायोग म्हणजे 34 वर्षांपूर्वी डिसेंबर 1988 मध्येच सचिनने रणजी ट्रॉफिच्या पदार्पणात सेंन्च्युरी ठोकली होती. अर्जुनने चौथ्या नंबरवर येऊन आपला पार्टनर सुयाश प्रभूदेसाई बरोबर 200 रन्सची पार्टर्नरशिप केली.

हे पण वाचा : प्रियंकाचा एक्स आणि फोनवर सेक्स, वाचा धक्कादायक खुलासे

गोवाने 410 रन्स केले असून अर्जुनने 15 फोर आणि 2 सिक्सर मारून 112 रन्सची दमदार कामगिरी केली. अर्जुनने यापूर्वी टी-20 मधून मुंबईकडून खेळला होता. यावर्षाच्या सुरूवातीला अर्जुन तेंडुलकरने गोवा टीमबरोबर खेळायला सुरुवात केली होती.

हे पण वाचा : दिशा पटानीच्या स्लिम फिट बॉडीचं रहस्य

आपल्या इनिंगमध्ये अर्जुन तेंडुलकरने 26 सिंगल, 7 डबल रन्स केले. अर्जुनने 56 च्या स्ट्राईक रेटने रन्स केले आणि 131 डॉट बॉल्स सुद्धा खेळल्या. अर्जुनने आपल्या या इनिंगमध्ये 120 रन्स करुन आऊट झाला. त्याने 207 बॉल्स खेळत 16 फोर आणि दोन सिक्सर लगावले. अर्जुनला कमलेश नागरकोटीने आऊट केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी