Arjun Tendulkar Latest : आयपीएलपूर्वी अर्जुन तेंडुलकरचा दबदबा! 10 सामन्यात घेतले इतके बळी, मुंबई इंडियनला दिलासा

Cricket Update : अनेकदा स्टार किड म्हणून अर्जुनवर टीकादेखील झाली आहे. यामुळेच असेल किंवा इतर कारणामुळे असेल मात्र मुंबई इंडियन्सदेखील (Mumbai Indians)अर्जुनला दोन वर्षे आपल्या संघात तर समाविष्ट केलेले आहे मात्र एकाही क्रिकेट (Cricket) सामन्यात त्याला खेळवलेले नाही. मात्र मागील सामन्यात अर्जुन तेंडुलकरने चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याने भरपूर विकेट्स घेतल्या आहेत.

Arjun Tendulkar
अर्जुन तेंडुलकर 
थोडं पण कामाचं
  • स्टार किड म्हणून अर्जुन तेंडुलकर नेहमीच चर्चेत
  • गोव्याकडून खेळताना अर्जुनची चमकदार कामगिरी
  • यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पणाची शक्यता

Arjun Tendulkar Latest Performance : नवी दिल्ली : अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एरवी सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा म्हणून त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असतेच. अनेकदा स्टार किड म्हणून अर्जुनवर टीकादेखील झाली आहे. यामुळेच असेल किंवा इतर कारणामुळे असेल मात्र मुंबई इंडियन्सदेखील (Mumbai Indians)अर्जुनला दोन वर्षे आपल्या संघात तर समाविष्ट केलेले आहे मात्र एकाही क्रिकेट (Cricket) सामन्यात त्याला खेळवलेले नाही. अर्जुनच्या बाबतीत मुंबई इंडियनने जोखीम घेतलेली आहे. मात्र अर्जुनने आपल्या कामगिरीने यावर उत्तर दिले आहे. गोव्याकडून विजय हजारे ट्रॉफी ( List A) खेळणाऱ्या अर्जुनने मागील पाच सामन्यांमध्ये 5 गडी बाद केले आहेत. (Arjun Tendulkar performs in match against Arunachal Pradesh in Vijay Hazare trophy)

अधिक वाचा  : पगार पुरतच नाही...मग कशी आणि किती बचत करावी? मोठ्या टिप्स

SMAT मध्ये देखील दाखवला जलवा

याशिवाय अर्जुन तेंडुलकरने स्मॅट म्हणजे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) मध्येही त्याने चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. या ट्रॉफीमध्येदेखील त्याने भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या मागील पाच सामन्यांमध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध खेळताना अर्जुनने 4 बळी घेतले. या सामन्यात त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. याव्यतिरिक्त नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्येसुद्धा अर्जुनने 61 धावांत 2 गडी बाद केले होते.

शनिवारी अरुणाचल प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने नऊ षटकांत 28 धावा देत एक विकेट घेतली. शिवाय क्षेत्ररक्षणातदेखील आपली छाप सोडत या सामन्यात त्याने दोन झेलही घेतले. अर्जुनने गेल्या 10 सामन्यांमध्ये एकूण 13 गडी बाद केले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये मिळून अर्जुनकडे 17 गडींची नोंद झाली आहे.

अधिक वाचा  : मनुक्याचे पाणी मिळवू देऊ शकते या 4 आजारांपासून मुक्ती

अमुल्य पेंडरेकरची गोलंदाजी

अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या गोवा या सामन्यातील कामगिरीकडे पाहायचे तर अरुणाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 175 धावा केल्या. गोव्याच्या संघाकडून अमुल्य पेंडरेकरने जबरदस्त गोलंदाजी करताना 9 षटकांत 41 धावा देत 5 बळी घेतले. तर लक्ष्य गर्गने 8 षटकांत 32 धावा देत 3 बळी घेतले. येदांत नाईकला एक गडी बाद करता आला. आपल्यासमोर धावांचा पाठलाग करताना गोव्याचा फलंदाज स्नेहल कौठणकरने 68 तर कर्णधार सुयश प्रभुदेसाईने 62 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

अधिक वाचा  :अदानींचा अंदाज, 2050पर्यत देशाची अर्थव्यवस्था जगात दुसरी

मुंबईला मोठा दिलासा 

अर्जुन तेंडुलकर आतापर्यत लिस्ट ए चे 5 सामने आणि टी20चे 9 सामने खेळला आहे. हे सामने खेळताना त्याने लिस्ट ए मध्ये 5 तर टी-20 मध्ये 12 गडी बाद केले आहेत. अर्जुनने 12 नोव्हेंबर 2022 रोजी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले होते. याशिवाय मागील वर्षी जानेवारीमध्ये त्याचे टी20 मध्ये पदार्पण झाले होते. लिस्ट ए मध्ये अर्जुनची सरासरी 5.07 आणि टी-20 मध्ये 6.60 इतकी आहे.

एरवी कामगिरीच्या आघाडीवर सतत दबाव असणाऱ्या अर्जुनच्या या दणकेबाज कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला दिलासा मिळत उत्साह नक्कीच वाढला असेल. यावेळेसदेखील मुंबई इंडियन्सने त्याला संघात ठेवले आहे. यंदाच्या मोसमात आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी अर्जुन मिळेल अशी शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी