कोचचा खुलासा, पाकिस्तानविरुद्ध कॅच सुटल्यानंतर अर्शदीपने पाठवला होता हा मेसेज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 14, 2022 | 13:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Arshdeep Singh, India vs Pakistan: पाकिस्तानविरुद्ध आशिया कप २०२२ सामन्यात कॅच सुटल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेल्या अर्शदीप सिंहने आपल्या कोचला काय मेसेज केला होता याचा खुलासा खुद्द कोचने केला आहे. 

arshadeep singh
पाकिस्तानविरुद्ध कॅच सुटल्यावर अर्शदीपने पाठवला होता मेसेज 
थोडं पण कामाचं
  • अर्शदीप सिंहच्या कोचने केला खुलासा
  • पाकिस्तानविरुद्ध सामन्यात कॅच सुटल्यानंतर अर्शदीपने केला होता मेसेज
  • ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता अर्शदीप, मात्र खेळाडूला दुसऱ्याच गोष्टीची चिंता

मुंबई: आशिया कप २०२२(asia cup 2022) टीम इंडियासाठी(team india) खूपच खराब राहिला. या स्पर्धेत विराट कोहली(virat kohli) फॉर्ममध्ये परतल्याने टीम इंडियासाठी चांगली गोष्ट ठरली मात्र याशिवाय बऱ्याच आठवणी टीम इंडियाने(team india) लवकरात लवकर विसरल्या पाहिजेत. या सामन्यात सगळ्यात वाईट घडलेली गोष्ट म्हणजे जेव्हा पाकिस्तानविरुद्ध सामन्यात युवा गोलंदाज अर्शदीप सिंहद्वारे(arshadeep singh) एक कॅच सुटला आणि भारताच्या हातातून तो सामना सुटला. या सामन्यानंतर अर्शदीपवर खूप टीका झाली आणि त्याला खूप ट्रोल करण्यात आले. मात्र त्याच्या कोचने खुलासा केला की अर्शदीपवर याचा कोणताही परिणाम झाला नव्हता. arshadeep send message to his coach after drop catch against Pakistan

अधिक वाचा - पैसे दिले म्हणून गवंडीनं घेतला असा बदला, थेट पेटवली मर्सिडीज

पाकिस्तानविरुद्ध त्या सामन्यात जेव्हा रवी बिश्नोईच्या १८व्या ओव्हरमध्ये आसिफ अली शून्यावर खेळत होता तेव्हा अर्शदीपने  त्याचा एक सोपा कॅच सोडला होता.  त्यानंतर आसिफने ८ बॉलमध्ये नाबाद १६ धावांची छोटी मात्र धुआंधार खेळी करत संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले होते. अर्शदीपने गोलंदाजीत आपल्या बॉलने चांगली कामगिरी केली मात्र फिल्डिंगमध्ये त्याची ती चूक भारी पडली. यानंतर टीकाकारांनी त्याच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. 

एकीकडे ट्रोलर्स अर्शदीप सिंहला ट्रोल करण्यात कोणतीच कसर सोडत नव्हते तर दुसरीकडे सर्व चाहत्यांचे असे म्हणणे होते की अर्शदीपला कसे वाटत असेल. अर्शदीपच्या लहानपणाच्या कोचनी जसवंत राय यांनी खुलासा केला की अखेर त्या रात्री अर्शदीपची मनस्थिती कशी होती आणि त्यांनी आपल्या शिष्याशी खास बातचीत केली. कोचनी सांगितले की बातचीतशिवाय अर्शदीपने त्यांना एक मेसेजही पाठवला होता. 

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अर्शदीपचे कोच जसवंत राय म्हणाले, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर अर्शदीप माझ्याशी बोलला. त्याने मला एक मेसेजही पाठवला. यात त्याने लिहिले की तो ट्रोलर्स आणि सोशल मीडियावर झालेल्या गोंधळाबाबत चिंता करत नाही. मात्र तो या गोष्टीने दुखी होता की त्याने पाकिस्तानविरुद्ध आपल्या गोलंदाजीदरम्यान एक बाऊंड्री गमावली होती. तो त्या बाऊंड्रीने त्रस्त होता. 

अधिक वाचा - गोवा: काँग्रेसचे अकरापैकी आठ आमदार भाजपमध्ये दाखल

कोच जसवंत रायने हेच मत नोंदवले होते की त्या दिवशी कर्णधाराने १९वी ओव्हर भुवनेश्वर कुमारला नव्हे तर अर्शदीप सिंहला द्यायला हवी होती. त्यांचे म्हणणे आहे की अर्शदीपने दबावाच्या स्थितीत दोन्ही सामन्यात शानदार यॉर्कर बॉल टाकला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी