PAK vs AUS: ICU तून बाहेर येताच सेमीफायनलमध्ये या पाकिस्तानी खेळाडूने धमाकेदार फलंदाजीने गाजवलं मैदान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 12, 2021 | 14:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

PAK vs AUS: मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) उपांत्य फेरीच्या (Semifinals) सामन्याच्या आदल्या रात्री रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते, असे फलंदाजी प्रशिक्षक (Batting coach) मॅथ्यू हेडन यांनी सांगितले.

Pakistani player  Mohammad Rizwan
ICU तून बाहेर येताच तो देशासाठी उतरला मैदानात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मोहम्मद रिझवानला उपांत्य फेरीच्या सामन्याच्या आदल्या रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,
  • फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेला रिजवान देशाची जर्सी घालून मैदानात उतरला
  • त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात कांगारू गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.

PAK vs AUS: नवी दिल्ली : आपल्या देशासाठी खेळणे आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करणे हे बालपणी बॅट हातात घेणाऱ्या प्रत्येक मुलाचे स्वप्न असते. पाकिस्तानचा यष्टिरक्षक (Pakistan's wicketkeeper) फलंदाज (Batsman) मोहम्मद रिझवाननेही (Mohammad Rizwan) असेच उदाहरण मांडले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्याच्या रात्री रिझवानला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते, जेव्हा पाकिस्तान संघाला (Pakistan Team) त्याची सर्वाधिक गरज होती तेव्हा त्याने आपली प्रकृती बाजूला ठेवली. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात  उपचार घेत असलेला रिजवान देशाची जर्सी घालून मैदानात उतरला, जणू काही त्याला काही झालेच नाही. त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात कांगारू गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आणि 67 धावांची शानदार खेळीही खेळली. मात्र, गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघाचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. (As soon as he came out of the ICU, the Pakistani player came down to the field to play in the World Cup semifinals.)

आजारपणातून मैदानात उतरलेल्या रिजवानची अप्रतिम कामगिरी

याबाबत खुलासा करताना पाकिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन म्हणाले, 'मोहम्मद रिझवान हा सामन्याच्या आदल्या रात्री फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात होता. तो एक योद्धा आहे. या संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी अप्रतिम राहिली असून त्याच्याकडे खूप धैर्य आहे. एवढी मोठी झुंज देऊन मैदानात उतरल्याचे क्षणभरही रिजवानने मैदानावरील कोणालाही वाटू दिले नाही. तसेच त्याच्या खेळात कोणतीही कमतरता नव्हती. उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णधार बाबर आझमसह रिझवानने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. रिझवानने 52 चेंडूत 67 धावांची दमदार खेळी खेळली, ज्यामुळे संघाला 20 षटकात 176 धावांपर्यंत मजल मारता आली.

अनेक सामन्यात कर्णधाराला साथ दिली

मोहम्मद रिझवानने UAE आणि ओमानच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या विश्वचषकातील 6 सामन्यांमध्ये 70.25 च्या प्रभावी सरासरीने आणि 127.73 च्या स्ट्राइक रेटने 281 धावा केल्या. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या १० गडी राखून विजय मिळवण्यात यष्टीरक्षक-फलंदाजाने आपला कर्णधार बाबर आझमला पूर्ण पाठिंबा दिला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात 22 धावांची गरज होती, पण मॅथ्यू वेडने स्फोटक फलंदाजी करत शाहीन आफ्रिदीच्या 19व्या षटकात सलग तीन षटकार मारून सामना संपवला.

९६ धावांत पाच विकेट्स गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला एका क्षणी संघर्ष करावा लागला होता, पण त्यानंतर मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेड यांच्यातील ८१ धावांच्या तुफानी भागीदारीने पाकिस्तानचा विजय हिरावून घेतला. स्टॉइनिसने 31 चेंडूत 40 आणि अवघ्या 17 चेंडूत 41 धावा फटकावत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. डेव्हिड वॉर्नरनेही आघाडीच्या फळीत 30 चेंडूत 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी