Ashes 2019: जोफ्रा आर्चरचा बाऊंसर मानेला लागला, तरीही स्टिव्ह स्मिथ पुन्हा मैदानावर उतरला

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 19, 2019 | 13:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ashes 2019: अॅशेस सीरीजमध्ये सलग ७ अर्धशतकं करण्याचा विक्रम स्टिव्ह स्मिथनं केलाय, अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. दुसऱ्या मॅचमध्ये जोफ्रा आर्चरचा बॉल मानेला लागल्यानंतर स्मिथ मैदानावरच कोसळला होता.

steve smith injury
ड्रॉ सामन्यात स्टिव्ह स्मिथची जीगरबाज खेळी  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • इंग्लंडमध्ये सुरू आहे अॅशेस क्रिकेट मालिका; दोन सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाची १-० आघाडी
  • दुसरा सामना झाला ड्रॉ; स्टिव्ह स्मिथच्या जिगरबाज खेळीची चर्चा
  • मानेवर बॉल लागल्यानंतरही स्टिव्ह स्मिथ दहा मिनिटांनी पुन्हा मैदानावर उतरला; शतक ८ धावांनी हुकले

लंडन : सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेली अॅशेस सीरिज रंगतदार वळणावर आहे. सीरिजमध्ये दोन सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियानं १-० अशी आघाडी घेतली आहे. तरी, इंग्लंड कोणत्याही मॅचमध्ये कमबॅक करून बरोबरी करू शकतो. सीरिजचा दुसरा सामना ड्रॉ झाला. पण, या मॅचमध्ये स्टिव्ह स्मिथच्या जिगरबाज खेळीचं कौतुक झालं. त्याचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं. पण, जखमी झाल्यानंतरही तो मैदानात उतरला होता. त्यानं अॅशेस सीरीजमध्ये सलग सात अर्धशतक करण्याचा अनोखा विक्रम केलाय. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. जोफ्रा आर्चरचा बॉल मानेला लागल्यानंतर स्मिथ मैदानावरच कोसळला होता. त्याला ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आलं. त्याची सगळी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी ही पुन्हा मैदानावर उतरण्यासाठी तो उत्सुक होता, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टिन लंगरनं दिलीय.

दहा मिनिटांत पुन्हा मैदानावर

स्मिथ मैदानावर कोसळला तेव्हा तो वैयक्तिक ८० धावांवर खेळत होता. लंचनंतर खेळ सुरू झाला होता. त्यावेळी आर्चरचा एक जबरदस्त बाऊंसर स्मिथला मानेवर लागला. स्मिथ जागेवरच कोसळला. इंग्लंडच्या जोस बटलरनं तातडीनं मैदानावर त्याला मदत केली. त्याचवेळी पॅट कमिंस आणि इंग्लंडच्या इतर खेळाडूंनी त्याला सावरलं. थोड्यावेळानं स्मिथ भानावर आला. त्याला ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आलं. त्याची सगळ्या पद्धतीनं मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्यानंतर स्मिथ पुन्हा मैदानावर उतरला. चौकार मारून त्यानं आपलं शतक साजरं करण्याचे इरादे स्पष्ट केले. स्मिथने दहा मिनिटांनी पुन्हा मैदानावर धाव घेतली आणि चौकार मारून ऑस्ट्रेलियाच्या गोटात उत्साह वाढवला होता. पण, दुदैवानं तो शतक पूर्ण करू शकला नाही. तो ८० धावांवर जायबंदी झाला होता. त्यात त्यानं १२ धावांची भर घातली आणि तो ९२ वर आऊट झाला. त्याचं शतक ८ धावांनी हुकलं असलं तरी, त्याची खेळी सगळ्यांच्याच स्मरणात राहणारी आहे.

तो पूर्णपणे फिट आहे : लँगर

या प्रसंगाविषयी ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टीन लँगर म्हणाला, ‘स्मिथला हेल्मेटला किंवा डोक्याला मार बसला नाही. त्याला मानेवर चेंडू लागला होता. हा मार काहीसा किरकोळ असला तरी, त्याचा थोडा परिणाम झाला. पण, तो मेडिकल रूममधून बाहेर पडाला आणि त्यानं मी ठीक आहे. पुन्हा मैदानावर जाणार आहे, असे सांगून सागळ्यांनाच धक्का दिला. स्मिथनं मेडिकल टीमनं घेतलेल्या सगळ्या टेस्ट पास केल्या. तो पूर्णपणे ठीक आहे.’ स्मिथ मैदानावर पडल्यामुळे सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. लँगर म्हणाला, ‘मी त्याला तू पूर्णपणे ठीका आहेस का?, असे वारंवार विचारले. हे टीमचे खेळाडू मला माझ्या मुलांसारखे आहेत. त्यांना काही झालं तर, मी अस्वस्त होतो. स्मिथनं त्यावेळी बॅटिंगला जाण्याची इच्छा व्यक्त केली. तो क्रिकेटसाठी समर्पित झालेला खेळाडू आहे. स्मिथच्या हाताला एक छोटी दुखापत असल्यामुळं तो, फॉरवर्ड आणि डिफेन्स असा खेळात बदल करू शकत नव्हता. त्याचा हात दुखत होता. मैदानावर जाण्यापूर्वी याचीच त्याला चिंता होती. पण, तो आता पूर्णपणे फिट आहे. चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...