VIDEO:बेन स्टोक्स क्लीन बोल्ड तरीही राहिला NOT OUT

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 07, 2022 | 17:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ashes 2021: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सिडनीमध्ये चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर असे काही घडले ज्यामुळे सारेच हैराण झाले. 

ben stokes
VIDEO:बेन स्टोक्स क्लीन बोल्ड तरीही राहिला NOT OUT 
थोडं पण कामाचं
  • ग्रीनने ओव्हरमधील पहिला बॉल टाकला आणि सारेच हैराण झाले
  • स्टोक्सने आत येणाऱ्या या चेंडूवर शॉट खेळला नाही,
  • बॉल इतक्या वेगात असतानाही तो ऑफ स्टम्पला आदळला मात्र बेल्स पडल्या नाहीत

मुंबई: बॉल विकेटवर पूर्ण वेगाने लागत असेल आणि फलंदाज बादच झाला नाही...तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे... अहो पण हे शक्य झालंय. तेही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड(england vs australia) यांच्यात सिडनी(sydney) येथे चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी असे काही घडले ज्यामुळेच सारेच हैराण झाले. ही घटना इंग्लंडचा ऑलराऊंडर क्रिकेट बेन स्टोक्ससोबत(ben stokes) घडली. मा याचा संपूर्ण फायदा इंग्लंडने उचलला. जाणून घ्या कसा घडला हा किस्सा. Ashes 2022: ben stokes clean bold but remain not out

सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ फलंदाजी करत होता. लंचनंतर बेन स्टोक्स(ben stokes) आणि जॉनी बेअरस्ट्रॉ क्रीझवर होते. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३१वी ओव्हर टाकण्यासाठी कॅमरून ग्रीन आला. स्ट्राईकवर इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स होता. ग्रीनने ओव्हरमधील पहिला बॉल टाकला आणि सारेच हैराण झाले. स्टोक्सने आत येणाऱ्या या चेंडूवर शॉट खेळला नाही, बॉल ऑफ स्टम्पला धक्का देत विकेटच्या मागे गेला. मात्र अंपायर अथवा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हे समजले. 

स्टोक्सला मिळाले जीवनदान

टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की ग्रीनचा बॉल स्टोक्सच्या बॅटला न लागता सरळ ऑफ स्टम्पला आपटला होता. विशेष म्हणजे बॉल इतक्या वेगात असतानाही तो ऑफ स्टम्पला आदळला मात्र बेल्स पडल्या नाहीत. अंपायरलाही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला निर्णय बदलावा लागला आणि स्टोक्सला जीवनदान मिळाले. खुद्द स्टोक्सही या घटनेने हैराण झाला होता. ज्यावेळी ही घटना त्यावेळेस तो १६ धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने अर्धशतक पूर्ण केले. 

वॉर्न आणि गिलख्रिस्टही झाले हैराण

फॉक्स स्पोर्ट्सवर काँमेंट्री करणारे शेन वॉर्नही हे पाहून हैराण झाले. ते म्हणाले, मी असे याआधी कधीच पाहिले नव्हते. अंपायरने आऊट घोषित केले. मात्र हे काही गजबच घडले. पॉल  रायफल खुद्द एक गोलंदाज आहे आणि त्यांनी स्वत: बॉलला स्टम्पला आदळताना पाहिले आणि नंतर बाद घोषित केले. मात्र बेल्स काही पडल्या नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी