T20 world cup Nehara's Team Predication : आशिष नेहरानं टी20 विश्वकपसाठी निवडली टीम, गोलंदाजांचा केलाय भरणा

आशिया कप टी20 (Asia Cup T20) मधून भारत बाहेर पडल्यानंतर आता अनेकांच्या नजरा या पुढील टी20 विश्वकपकडे (T20 World Cup) लागले आहे. आशिया कपमध्ये (Asia Cup) भारताचं दिसलेलं कमजोर कामगिरी पाहता दिग्गज किक्रेटपटू (cricketer) पुढील विश्वकपसाठी भारतीय संघाने (Indian team) कोणता संघ निवडला पाहिजे याचा अंदाज बांधू लागले आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज (fast  bowler) आशिष नेहरानेही संघ (Team) निवडीवर आपला अंदाज वर्तवला आहे.

Gujarat team coach selected Team India for T20 World Cup
गुजरात संघाच्या कोचनं निवडली टी20 विश्वकपसाठी टीम इंडिया  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नेहराने जखमी रवींद्र जडेजाला आपल्या संघात समाविष्ट केले.
  • नेहराजींनी टी-२० विश्वचषकासाठी मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यासाठी आग्रही.
  • नेहराने संघात चार वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटूंचा समावेश केला.

नवी दिल्ली: आशिया कप टी20 (Asia Cup T20) मधून भारत बाहेर पडल्यानंतर आता अनेकांच्या नजरा या पुढील टी20 विश्वकपकडे (T20 World Cup) लागले आहे. आशिया कपमध्ये (Asia Cup) भारताचं दिसलेलं कमजोर कामगिरी पाहता दिग्गज किक्रेटपटू (cricketer) पुढील विश्वकपसाठी भारतीय संघाने (Indian team) कोणता संघ निवडला पाहिजे याचा अंदाज बांधू लागले आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज (fast  bowler) आशिष नेहरानेही संघ (Team) निवडीवर आपला अंदाज वर्तवला आहे.  (Ashish Nehra has selected the team for the T20 World Cup, the bowlers get chance in his team)

आशिष नेहरा यांनी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी संभाळली होती. नुसती संभाळली नाही तर त्यांनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात संघाला आयपीएलमध्ये पदार्पण करताच कप मिळवून दिलाय. नेहरासोबत असलेल्या अनुभव पाहता आणि यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी पाहता त्यांनी अंदाजित निवडलेल्या संघाला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान नेहरा यांनी रविंद्र जडेजाला आपल्या संघात जागा दिली आहे. जडेजा सध्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे उपचार घेत आहे. या दुखापतीमुळे जडेजाला आशिया कपमधील उर्वरित सामने सोडावे लागले होते. आशिष नेहरा यांनी त्याला संघात घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Read Also : संतापलेल्या दाजीनं मेहुण्याच्या डोक्यात घातला रॉड

सूर्यकुमार यादव हा संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू 

आयसीसीच्या T20 विश्वचषकाशी संबंधित एका विशेष कार्यक्रमात नेहराने सांगितले की, आशिया कप खेळण्यासाठी गेलेल्या संघात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. नेहराच्या संघात रोहित शर्मा आणि केएल राहुल हे सलामीवीर असतील.  सूर्यकुमार यादव संघाचा महत्त्वाचा भाग असेल. तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करत असला तरीही. तो एकमेव खेळाडू आहे ज्याला ज्या काही क्रमांकावर संधी मिळाली आहे, त्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने जोरदार फटकेबाजी करत आपल्याला सिद्ध केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे.

दुखापतग्रस्त जडेजाला घ्या संघात,  शमीला मिळावी संधी 

वेगवान गोलंदाजीत नेहराने जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांची निवड केली आहे. नेहराचा असा विश्वास आहे की, मोहम्मद शमीकडे संघात घेण्याचे सर्व कौशल्य आहे परंतु संघ व्यवस्थापनाने त्याच्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.  फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांनी त्यांनी संघात स्थान दिलं आहे. रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या हे अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात असतील. दुसरीकडे, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून नेहराच्या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले.

Read Also : ऐकलं का! 16 ऑक्टोबरपर्यंत या 7 राशींच्या सुखात होणार वाढ

टी20 विश्व कपसाठी नेहरा यांचा असा असेल भारतीय संघ 

 रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, दीपक हुडा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी