Kabbdi : अशोक मंडळाला जेतेपद. शिवनेरी मंडळाचा यश राक्षे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला

अशोक मंडळाने रणझुंजार संघ आयोजित कुमार गट कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. शिवनेरी सेवा मंडळाचा यश राक्षे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

Ashok Mandal wins. The success of Shivneri Mandal became the best player in the Rakshe competition
 Kabbdi : अशोक मंडळाला जेतेपद. 
थोडं पण कामाचं
  • रणझुंजार संघ कुमार गट कबड्डी स्पर्धा-२०२२.
  • अशोक मंडळाने रणझुंजार संघ आयोजित कुमार गट कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.
  • शिवनेरी सेवा मंडळाचा यश राक्षे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

 मुंबई : अशोक मंडळाने रणझुंजार संघ आयोजित कुमार गट कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. शिवनेरी सेवा मंडळाचा यश राक्षे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. चिंचपोकळी(पूर्व) येथील स्व. सुरेश आचरेकर मैदानावर संपन्न झालेल्या कुमार गटाच्या अंतिम सामन्यात अशोक मंडळाने मध्यांतरातील १५-२० अशा पिछाडीवरून शिवनेरी मंडळाचा ४६-२६ असा पराभव करीत "स्व. मानसी हरीश घाडी चषक" व रोख रु.पाच हजार(₹५,०००/-) ची कमाई केली.

उपविजेत्या शिवनेरीला "स्व. सुषमा दत्तात्रय परब चषक" व रोख रु. तीन हजार (₹३,०००/-) वर समाधान मानावे लागले. आक्रमक सुरुवात करीत शिवनेरीने पहिला लोण देत दहाव्या मिनिटालाच १७-०३ अशी मोठी आघाडी घेतली. पण त्याने नाउमेद न होता अशोक मंडळाने त्याच डावात लोणाची परतफेड करीत ही आघाडी कमी करीत आणली. विश्रांतीला खेळ थांबला तेव्हा अवघ्या ५ गुणांची आघाडी शिवनेरीकडेच होती. 


विश्रांतीनंतर खेळाला सुरुवात झाली तेव्हा अशोक मंडळ एका वेगळ्याच इराद्याने मैदानात उतरले. या डावात अशोक मंडळाने टॉप गिअर टाकत आपला खेळ अधिक गतिमान केला. त्यांनी या डावात शिवनेरीवर ३ लोण देत ३० गुणांची कमाई केली आणि आपला विजय सोपा केला. या उलट पूर्वार्धात जोशपूर्ण खेळ करणाऱ्या शिवनेरीच्या खेळाडूंना उत्तरार्धात आपला प्रभाव पाडता आला नाही. या डावात त्यांना अवघे ४गुण मिळविता आले. त्यामुळे शिवनेरीला पराभवाचा सामना करावा लागला. सूरज सुतारचा अष्टपैलू खेळ त्याला संतोष ठाकूर, ओमकार कामतेकर यांची मिळालेली चढाईची आणि शशांक मोकल, विघ्नेश पाटील यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे अशोक मंडळाने आपला हा विजय मोठ्या फरकाने साकारला. यश राक्षे, जतीन शिंदे, अजय गुरव यांना पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात दाखविता आला नाही.

या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अशोक मंडळाने श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाचा ४९-३४ असा तर शिवनेरी सेवा मंडळाने विजय बजरंगचा ६८-३९ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रु. दोन हजार(₹२,०००/-) व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाचा तुषार शिंदेला स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा, अशोक मंडळाच्या शशांक मोकलला उत्कृष्ट पकडीचा, तर विजय बजरंगच्या शुभम शिंदेला लक्षवेधी खेळाडू म्हणून आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी