WATCH: सिक्स जाणार इतक्यात तिथे आला सुपरमॅन आणि....

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 17, 2022 | 17:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

AUS vs ENG: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला वनडे सामन्यात अॅश्टन एगरने कमालीची फिल्डिंग केली. एगरने एका हाताने बॉल पकडला आणि बाऊंड्रीपार फेकला. एगरने ज्या पद्धतीने सिक्स होण्यापासून वाचवले ते पाहता त्याला सुपरमॅन म्हटले जात आहे. 

agar catch
WATCH: सिक्स जाणार इतक्यात तिथे आला सुपरमॅन आणि.... 
थोडं पण कामाचं
  • पॅट कमिन्सच्या 45व्या ओव्हरमध्ये डेविड मलानने शानदार शॉट खेळला.
  • एगर बाऊंड्री लाईनजवळ उभा होता.
  • यावेळेस बॉल आपल्याकडे येत असलेला पाहून त्याने जोरात उडी घेतली.

मुंबई: क्रिकेटच्या मैदानावरील अनेक व्हिडिओ(video) सातत्याने व्हायरल() होत असता. एखाद्या फलंदाजाने जबरदस्त शॉट मारला असेल अथवा जबरदस्त फिल्डिंग केली असेल. अथवा एखाद्याने जबरदस्त रनआऊट केला असेल. असाच एक व्हिडिओ अॅडलेडच्या मैदानाचा आहे ज्याला सोशल मीडियावर(social media) मोठी पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलिया(australia) आणि इंग्लंड(england) यांच्यातील मालिकेतील पहिला वनडे सामन्यातील आहे. यात एश्टन एगरने(ashton agar) जबरदस्त फिल्डिंग केली आणि सिक्स जाण्यापासून वाचला. ashton agar catch video viral on social media

अधिक वाचा - कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींची प्रकृती अचानक बिघडली

एगरचा व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर एश्टन एगरच्या जबरदस्त फिल्डिंगशी संबंधित आहे. पॅट कमिन्सच्या 45व्या ओव्हरमध्ये डेविड मलानने शानदार शॉट खेळला. एगर बाऊंड्री लाईनजवळ उभा होता. यावेळेस बॉल आपल्याकडे येत असलेला पाहून त्याने जोरात उडी घेतली. एगरने एका हाताने बॉल पकडला आणि बाऊंड्रीच्या या बाजूला त्याने बॉल फेकला. एगरने ज्या पद्धतीने फिल्डिंग केली त्यावरून त्याला सुपरमॅनपेक्षा कमी म्हणता येणार नाही. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूने एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओत एश्टन एगरची फिल्डिंग तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की हे क्रेझी आहे. एश्टन एगरचे कौतुक करा. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकदा रिट्वीट करण्यात आले आहे. 

अधिक वाचा - म्हातारपणात प्रेमात वेडी झालेल्या महिलेनं पतीची केली हत्या

मलानने ठोकले शतक

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकला आणि इंग्लंडला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बोलावले. इंग्लिश संघाने डेविड मलानच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावताना 287 धावा केल्या. मलानने 128 बॉलवर 12 चौकार आणि 4 षटकार ठोकले. याशिवाय डेविड विलीने नाबाद 34 धावा ठोकल्या. विलीने 40 बॉलमध्ये आपल्या खेळीदरम्यान 3 चौकार ठोकले. ऑस्ट्रेलियासाठी कमिन्सने 3 विकेट घेतल्या. अॅडम झम्पाने 55 धावा देताना तीन विकेट आपल्या नावे केल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी