Ashwin and Iyer helped India win both Test against Bangladesh : भारताने बांगलादेश विरुद्धची दोन टेस्ट मॅचची सीरिज 2-0 अशी जिंकली. ढाक्यात झालेली दुसरी टेस्ट मॅच भारताने चौथ्या दिवशी जिंकली. । स्कोअर
टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद 227 धावा आणि दुसऱ्या डावात सर्वबाद 231 धावा केल्या. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 314 आणि दुसऱ्या डावात 7 बाद 145 धावा केल्या. टीम इंडियाने ढाक्यात झालेली दुसरी टेस्ट मॅच 3 विकेट राखून जिंकली.
ढाक्यातील विजयामुळे भारताने टेस्ट सीरिजमध्ये बांगलादेशविरुद्ध विजयाची मालिका सुरू ठेवली. भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 13 टेस्ट मॅच झाल्या आहेत. यापैकी 11 मॅच मध्ये भारताचा विजय झाला आहे.
ढाका टेस्टमध्ये बॉलरचा प्रभाव जाणवू लागला. विकेट जाऊ लागल्या. यामुळे मॅचच्या शेवटच्या डावात (चौथ्या डावात) विजयासाठी भारताला 145 धावा करण्याचे आव्हान मिळाले. या धावा करताना भारताला 7 विकेट गमावल्या. पण श्रेयस अय्यरने नाबाद 29 आणि आर. अश्विनने नाबाद 42 धावा करून टीम इंडियाच्य विजयावर शिक्कामोर्तब केले. मेहदी हसन मिराजने 5 तर शाकिब अल हसनने 2 विकेट घेतल्या.
विजयासाठी 145 धावांचे आव्हान मिळाले तेव्हा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होता. दिवस संपेपर्यंत भारताने भारताने 4 बाद 45 धावा केल्या होत्या. केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि विराट कोहली बाद झाले होते. अक्षर पटेल 27 आणि जयदेव उनाडकट 3 धावांवर नाबाद होता. चौथ्या दिवशी विजयासाठी आवश्यक उर्वरित 100 धावा करताना टीम इंडियाचे आणखी 3 बॅटर बाद झाले. उनाडकट 13 धावा करून परतला. रिषभ पंत 9 धावा करून बाद झाला तर अक्षर पटेल 34 धावा करून बाद झाला. यामुळे टीम इंडियासमोर पराभवाचे संकट निर्माण होणार की काय असे वाटू लागले. पण श्रेयस अय्यर आणि आर. आर. अश्विन या दोघांनी परिस्थिती सावरली. यामुळे भारताच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.
पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 2 अशा बांगलादेशच्या 6 बॅटरना बाद करणारा तसेच भारताच्या पहिल्या डावात 12 आणि दुसऱ्या डावात नाबाद 42 धावा करणारा आर. अश्विन ढाका टेस्टचा मॅन ऑफ द मॅच झाला. चेतेश्वर पुजारा मॅन ऑफ द सीरिज झाला.
ढाका येथे सुरू असलेल्या टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात 22 बॉल खेळून 1 धाव करून बाद झाला. तो मेहदी हसन मिराजच्या बॉलवर मोमिनुल हककडे कॅच देऊन परतला. विराट कोहली परतत होता आणि बांगलादेशचे खेळाडू आणखी एक विकेट मिळाली म्हणून एकमेकांची अभिनंदन करण्यासाठी एकत्र आले होते. नेमक्या त्याच वेळी मुश्फिकुर रहीमने विराट कोहलीला एक शिवी दिली. ही शिवी ऐकून संतापलेला विराट कोहली लगेच बांगलादेशच्या खेळाडूंच्या दिशेने गेला. त्याच्या चेहऱ्यावरून तो संतापल्याचे दिसत होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पंचांनी हस्तक्षेप केला. विराट कोहलीने पंचांकडे आपला विरोध प्रकट केला आणि मुश्फिकुर रहीमकडे बघत शिवी देऊन मैदान सोडले. या घटनेचा व्हिडीओ दुसरी टेस्ट संपली तरी व्हायरल होत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अर्थात WTCच्या फायनलमध्ये दाखल होण्यासाठी भारताला सहा पैकी पाच टेस्ट मॅच जिंकणे आवश्यक आहे. भारताने बांगलादेश विरुद्धची दोन टेस्ट मॅचची सीरिज 2-0 अशी जिंकली आहे. आता भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार टेस्ट मॅचची सीरिज खेळायची आहे. या सीरिजमधील किमान 3 मॅच जिंकल्यास भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची संधी मिळेल.