Asia Cup 2022: शाहिद आफ्रिदीच्या लेकीनं मैदानात फडकावला तिरंगा; का हातात घ्यावा लागला भारतीय ध्वज, बापानेच सांगितली सर्व कहाणी

पाकिस्तानचा माजी कर्णधार (Former Pakistan captain) आणि जगातील सर्वात घातक अष्टपैलू खेळाडूंपैकी (all-rounder) एक असलेल्या शाहिद आफ्रिदीचे (Shahid Afridi ) वादांशी जुने नाते आहे. आफ्रिदी आपल्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो, मात्र यावेळी त्याने असे वक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Shahid Afridi's daughter hoisted the indian flag
Asia Cup : भर मैदानात आफ्रिदीच्या लेकीनं फडकावला तिरंगा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शाहिद आफ्रिदी त्याच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो.
  • स्टेडियममध्ये पाकिस्तानचे फक्त 10 टक्के चाहते होते तर 90 टक्के चाहते भारताचे होते.
  • आशिया कप 2022 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान आफ्रिदीच्या मुलीने तिरंगा फडकावला.

Shahid Afridi Daughter Waved India Flag:  पाकिस्तानचा माजी कर्णधार (Former Pakistan captain) आणि जगातील सर्वात घातक अष्टपैलू खेळाडूंपैकी (all-rounder) एक असलेल्या शाहिद आफ्रिदीचे (Shahid Afridi ) वादांशी जुने नाते आहे. आफ्रिदी आपल्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो, मात्र यावेळी त्याने असे वक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आफ्रिदीने खुलासा केला की, भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या सुपर-4 (Super-4) दरम्यान त्याच्या मुलीने पाकिस्तानऐवजी भारताचा ध्वज तिरंगा (tricolor) फडकावला होता. (Asia Cup 2022:  Shahid Afridi's daughter hoisted the indian flag  in  field, the father told the whole story)

विशेष म्हणजे सांगताना हे सांगताना आफ्रिदीच्या चेहऱ्यावर आनंद होता. याआधी एक मुलाखतीत मुलीच्या एका कृत्यावर आफ्रिदी रागावला होता. मुलाखतीत बोलातना आफ्रिदी म्हणाला होता की, पाकिस्तानमध्ये भारतीय टीव्ही मालिका मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. देवी देवतांच्या मालिकादेखील बघितल्या जातात. ते पाहून माझी मुलगी आरती करु लागली होती. त्यावर मी भंयकर रागावलो होतो. निश्चितच ही गोष्टी धार्मिक आहे, परंतु लेकीनं तिरंगा फडकावल्यानंतरही आफ्रिदी मात्र आज खूश होता.  

आफ्रिदीचे वादांशी जुने नाते 

शाहिद आफ्रिदी त्याच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. शाहीद आफ्रिदी त्याच्या वयामुळे अनेक वादात सापडतो. 2019 मध्ये, आफ्रिदीने स्वतः खुलासा केला की 1996 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 37 चेंडूत शतक ठोकले तेव्हा तो 16 वर्षांचा नव्हता, तर ICC नुसार, आफ्रिदीचा जन्म 1 मार्च 1980 रोजी झाला होता. काही महिन्यांपूर्वी शाहिद आफ्रिदीने भारताला पाकिस्तानचा शत्रू देश म्हटले होते.

Read Also : आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक;वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा

या सामन्यात तिरंगा फडकावला 

दरम्यान, आशिया चषक 2022 च्या साखळी टप्प्यातील सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला, परंतु बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने सुपर-4 फेरीत भारतीय संघाचा 5 गडी राखून पराभव करून परत फेड केली.  मात्र, आता आशिया चषक २०२२ चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आमनेसामने असतील. दरम्यान, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, आशिया कप 2022 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान माझ्या लेकीनं तिरंगा फडकावला होता.

शाहिद आफ्रिदीचा मोठा खुलासा

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर सांगितले की, स्टेडियममध्ये पाकिस्तानचे फक्त 10 टक्के चाहते होते तर 90 टक्के चाहते भारताचे होते.  आफ्रिदीने साम टीव्हीला सांगितले की, 'होय मला कळले की तिथे भारतीय चाहते जास्त आहेत. माझे कुटुंब तिथे बसले होते.  माझी पत्नी सांगत होती की इथे फक्त 10 टक्के पाकिस्तानी आहेत, बाकीचे 90 टक्के भारतीय आहेत. पाकिस्तानी झेंडेही तिथे उपलब्ध नव्हते, त्यामुळे माझी धाकटी मुलगी हातात भारताचा झेंडा फडकावत होती.

Read Also : JEE-Advance चा निकाल आज जाहीर होणार

माझ्याकडे व्हिडिओ आहेत. मी ट्विट करायचा विचार करत होतो, पण नाही केलं. त्याचवेळी, या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात भारताचा 5 गडी राखून पराभव केला. विशेष म्हणजे 11 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना होणार आहे.

आफ्रिदीची क्रिकेट कारकीर्द खूप यशस्वी 

शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो पाकिस्तानचा सर्वात मोठा सामना विजेता खेळाडू आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान संघासाठी 27 कसोटी सामन्यात 1716 धावा आणि 48 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 398 वनडेमध्ये 8064 धावा आणि 395 विकेट घेतल्या आहेत. शाहिद आफ्रिदीची गणना टी-20 क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने 99 टी-20 सामन्यात 1416 धावा आणि 98 विकेट घेतल्या आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी