Asia Cup 2022 : बदला पूर्ण !, 10 महिन्यांनंतर त्याच मैदानावर भारताने केलं पाकला चित्त

Asia Cup 2022 : बदलापूर्ण !, 10 महिन्यांनंतर त्याच मैदानावर भारताने केलं पाकला चित्त

Breaking News
Asia Cup 2022 : बदलापूर्ण !, 10 महिन्यांनंतर त्याच मैदानावर भारताने केलं पाकला चित्त  
थोडं पण कामाचं
  • पांड्या-भुवनेश्वरसमोर पाकिस्तानचा संघ सरेंडर
  • पंड्या आणि जडेजाने अर्धशतकी भागीदारी केली
  • विराट कोहलीनेही 35 धावा केल्या

दुबई : भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांनी प्रथम गोलंदाजी केली. यानंतर फलंदाजांनी चांगली कामगिरी करत पंड्याने भारताला आशिया चषक मध्ये पहिला विजय मिळवून दिला. भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने मात केली. यासह त्याने या मैदानावर 10 महिन्यांपूर्वी झालेल्या टी-20 विश्वचषकात 10 विकेटने पराभवाचा बदलाही घेतला आहे. या सामन्यात प्रथम खेळताना पाकिस्तानने 147 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 19.4 षटकांत 5 गडी राखून लक्ष्य गाठले.  (Asia Cup 2022 : team India has avenged the defeat from Pakistan)

अधिक वाचा : IND vs PAK मॅच पाहायला स्टेडियममध्ये पोहोचली उर्वशी ; ट्रोलर्स म्हणाले 'शोधतेय RP ला'

तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा अष्टपैलू हार्दिक पांड्याने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात धुमाकूळ घातला. रविवारी दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला गेलेल्या पाकिस्तानी संघाचे कंबरडे मोडले. आपल्या स्पेलच्या शेवटच्या षटकात दोन मोठे विकेट घेत त्याने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले.


दुबईच्या हिरव्या विकेटवर गोलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी शानदार सुरुवात करून दिली. यानंतर हार्दिक पांड्या पहिला बदल म्हणून गोलंदाजीसाठी आला. त्याने इफ्तिकार अहमदला एका शानदार बाऊन्सरवर चालायला लावले. दिनेश कार्तिकने विकेटच्या मागे त्याचा अप्रतिम झेल घेतला. हार्दिकने तिसऱ्या षटकाची सुरुवातही त्याने विकेटने केली. रिझवानला एका शानदार शॉर्ट बॉलवर थर्डमॅन बाऊंड्रीच्या दिशेने शॉट खेळायला लावला आणि तिथेच आवेश खानने त्याचा झेल घेतला. यानंतर हार्दिकने आपली चमकदार गोलंदाजी सुरू ठेवली आणि तिसऱ्या चेंडूवर खुशदिल शाहला स्वीपर कव्हरमध्ये रवींद्र जडेजाने झेलबाद केले. हार्दिकने 25 धावांत 3 विकेट मिळवल्या.

अधिक वाचा : Asia cup 2022 : लवकर बाद होताच Babar Azam ची सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

पाकिस्तानचा संघ 147 धावांवर गारद 

भारतीय संघ जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांना हिरव्या विकेटवर स्विंग मिळत नाही म्हणून मैदानाच्या मध्यभागी योजना बदलण्यात आली आणि शॉर्ट पिच चेंडूंचा वापर शस्त्र म्हणून करण्यात आला आणि त्यांची योजना यशस्वी ठरली. भारताने त्यांच्या बहुतांश विकेट्स शॉर्ट पिच चेंडूंत घेतल्या आणि पाकिस्तानला 19.5 षटकांत 147 धावांत गुंडाळले.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या चेंडूवर केएल राहुल शून्यावर बाद झाला. यानंतर रोहित शर्मा (12) आणि विराट कोहली (35) यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. मात्र, दोघेही 3 धावांच्या अंतराने बाद झाले. डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाबने दोघांची विकेट घेतली. सूर्यकुमार यादवलाही मोठी खेळी करता आली नाही. 18 चेंडूत 18 धावा करून तो नसीम शाहचा दुसरा बळी ठरला. संघाने 89 धावांत 4 विकेट गमावल्या. त्यानंतर जडेजा आणि पंड्याने पार्टनरशीप केली. 

भारतीय संघाला शेवटच्या 5 षटकात 51 धावा करायच्या होत्या आणि 6 विकेट्स हातात होत्या. दानीने 16व्या षटकात 10 धावा दिल्या. त्यानंतर 17व्या षटकात नसीम शाहने 9 धावा दिल्या. आता 18 चेंडूत 32 धावा करायच्या होत्या. नसीम शाहने 18 वे षटक टाकले. रवींद्र जडेजाने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. ५व्या चेंडूवर षटकार मारला. या षटकात एकूण 11 धावा झाल्या. 19 वे षटक वेगवान गोलंदाज हारिस रौफने टाकले. पंड्याने 3 चौकार मारले. एकूण 14 धावा झाल्या. आता 6 चेंडूत 7 धावा करायच्या होत्या. शेवटचा ओव्हर डावखुरा फिरकी गोलंदाज नवाझने टाकला. जडेजा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने 29 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने पंड्यासोबत 52 धावांची भागीदारी केली. दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर एकही रन नाही. चौथ्या चेंडूवर पंड्याने षटकार ठोकून विजय मिळवला. तो 17 चेंडूत 33 धावा करून नाबाद राहिला. 4 चौकार आणि 1 षटकार मारला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी