Virat Kohali : जाडेजाबद्दलच्या या निर्णयायंतर विराटने जोडले हात आणि देवाचे मानले आभार, व्हिडीओ व्हायरल

काल भारत विरूध्द पकिस्तानचा सामना चांगलाच रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. या मॅचदरम्यान विराट कोहली देवाकडे प्रार्थना करताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

virat kohali praying
विराट कोहली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काल भारत विरूध्द पकिस्तानचा सामना चांगलाच रंगला.
  • या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला.
  • या मॅचदरम्यान विराट कोहली देवाकडे प्रार्थना करताना दिसला.

Virat Kohali   : मुंबई : काल भारत विरूध्द पकिस्तानचा सामना चांगलाच रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. या मॅचदरम्यान विराट कोहली देवाकडे प्रार्थना करताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (asia cup india vs pakistan match jadeja drs virat kohali prey to god video gone viral read in marathi)

Asia cup 2022 : लवकर बाद होताच Babar Azam ची सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

काल एशिया कप अंतर्गत भारत आणि पाकिस्तान असा सामना रंगला. पाकिस्तान विरोधातील मॅचमध्ये भारताने दमदार कामगिरी बजावत पाकिस्तानवर ५ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने २० ओव्हरमध्ये १४७ धावा काढल्या. भारतापुढे १४८ धावांचे आव्हान उभे होते. सुरूवातीला रोहित शर्माने १८ चेंडूत १२ धावा काढल्या आणि आऊट झाला. त्यानंतर के.एल राहुल शून्यावर बाद झाला. विराट कोहलीने ३४ बॉलमध्ये ३५ धावा काढल्या आणि आऊट झाला.  परंतु जेव्हा रवींद्र जाडेजा खेळत होता तेव्हा एलबीडब्ल्यूमध्ये अंपायरने त्याला आऊट असल्याचे सांगितले. तेव्हा विराटने अक्षरशः देवाकडे हात जोडले याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Andrew Symonds चं अख्खं कुटुंब उतरलं मैदानात, खेळाडूला वाहिली अनोखी श्रद्धांजली

जाडेजा जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा बॉल त्याच्या पायाला लागला. अंपायरने जाडेजा आऊट असल्याचे सांगितले, परंतु जाडेजाने डिसिजन रिव्ह्युची मागणी केली. तेव्हा सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचा श्वास रोखला होता. अगदी विराट कोहलीचा सुध्दा. परंतु डिसिजन रिव्ह्युमध्ये जाडेजा आऊट नसल्याचा निर्वाळा दिला. तेव्हा विराटने हात जोडून देवाचे आभार मानले. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवींद्र जाडेजाने एकूण ३५ धावा काढल्या तर हार्दिक पांड्याने नाबाद ३३ धावा काढल्या. जाडेजा आणि पांड्या भागीदाराने मिळून ५२ धावा काढल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. 

Ind vs Pak: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान टीम काळी पट्टी बांधून उतरणार मैदानात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी