क्रीडा विश्वात शोककळा : आशियाई खेळात सुवर्ण पदक जिंकणारे बॉक्सर डिंको सिंह यांचं निधन

अशियाई खेळात (Asian Games) सुवर्ण पदक विजेते (Gold medal winner) माजी बॉक्सर (Former boxer ) नगंगोम डिंको सिंह (Nagangom Dinko Singh)यांचं ४२ व्या वर्षी निधन (passes away ) झाले आहे.

Asian Games gold medalist boxer Dinko Singh passes away
सुवर्ण पदक विजेते बॉक्सर डिंको सिंह यांची जीवनाची झुंज अपयशी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • भारताला सुवर्ण पदक जिंकवून देणारे माजी बॉक्सर डिंको सिंह यांचे निधन.
  • डिंको सिंह यांनी १९९८ मध्ये बँकॉकमध्ये आयोजित असलेल्या आशियाई खेळात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं.
  • काही वर्षांपासून आजारपणात होते मुष्ठीयुद्धा (बॉक्सर) डिंको सिंह.

नवी दिल्ली : अशियाई खेळात (Asian Games) सुवर्ण पदक विजेते (Gold medal winner) माजी बॉक्सर (Former boxer ) नगंगोम डिंको सिंह (Nagangom Dinko Singh)यांचं ४२ व्या वर्षी निधन (passes away ) झाले आहे. त्यांनी १९९८ साली आशियाई खेळात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. डिंको सिंह काही वर्षांपासून आजारपणात होते, त्यांच्या यकृतावर उपचार चालू होते. 

या उपचारादरम्यान ते कोरोना संक्रमित झाले. परंतु कोविडला मात दिल्यानंतर ही डिंको सिंह यांची मृत्यू झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनावर क्रीडामंत्री किरेन रिजिजू (Sports Minister Kiren Rijiju) यांच्यासह अनेक खेळाडूंनी दु:ख व्यक्त केले आहे. डिंको सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत लिहिले की, ''मी डिंको सिंह यांच्या निधनामुळे दुखी झालो आहे. ते भारताच्या सर्वश्रेष्ठ मुष्ठियोद्ध्यांपैकी (Boxer) एक होते. साल १९९८ मध्ये बँकॉकमध्ये आशियाई खेळात डिंको यांनी जिंकलेल्या सुवर्ण पदकामुळे भारतात बॉक्सिंगला खूप लोकप्रियता मिळवून दिली. मी शोकग्रस्त कुटुंबासाठी तीव्र संवेदना व्यक्त करतो''.

तर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेंन सिंह यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले की, ''मला डिंको सिंह यांच्या निधनाची बातमी मिळाली, त्यामुळे मी निशब्द झालो आहे. पद्मश्री पुरस्कारप्राप्त डिंको सिंह मणिपूरच्या सर्वोत्कृष्ट मुष्ठियोद्ध्यांपैकी एक होता. शोकाकुल कुटुंबाबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो''.

संबित पात्रा यांनीही डिंको सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्विट करताना पात्रा म्हणाले, ''मणिपूर येथील प्रशंसित बॉक्सर श्री. डिंको सिंह यांच्या कुटुंबाला आणि मित्रांबद्दल माझे माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या आत्माला शांती देवो.''

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी