नवी दिल्ली: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आतापर्यंत भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 13 पदके आहेत.
यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू अप्रतिम कामगिरी करत आहेत. दरम्यान, भारतीय मिश्र 4x400 रिले संघाने कोलंबिया येथे सुरू असलेल्या विश्व U20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 (World U20 Athletics Championships 2022) मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली.
Congratulations #India SILVER MEDAL — Athletics Federation of India (@afiindia) August 3, 2022
at the World U20 Athletics Championships @WACali22
Indian 4x400m mixed relay team of Sridhar, Priya, Kapil & Rupal further improved the Asian U20 record with a time of 3:17.76 in that superb silver medal effort #IndianAthletics pic.twitter.com/qZADWbgMvK
भारताच्या 4x400 मीटर रिले संघाने आशियाई कनिष्ठ प्रस्थापित केला विक्रम
भारताच्या 4×400m मिश्र रिले संघाने जागतिक U20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये (World U20 Athletics Championships 2022) रौप्य पदक जिंकले. बराथ श्रीधर, प्रिया मोहन, कपिल आणि रुपल चौधरी यांनी ३:१७.७६ अशी वेळ नोंदवून भारतासाठी रौप्यपदक जिंकले. अमेरिकेने 3 मिनिटे 17.69 सेकंद वेळेसह पहिले स्थान पटकावले. गेल्या मोसमात भारताने कांस्यपदक जिंकले होते.
बुधवारी (3 ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार पहाटे 3.20 वाजता अंतिम सामना खेळला गेला. तत्पूर्वी, बराथ श्रीधर, प्रिया मोहन, कपिल आणि रुपल चौधरी या भारतीय चौकडीने हीट क्रमांक तीनमध्ये 3:19.62 सेकंद वेळ नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश केला.