भारताविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर 

Australia ODI and T20I squad against India: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पुढील महिन्यापासून वनडे-टी मालिका सुरू करणार आहे. त्यासाठी आता ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.

australia announced team for odi and t20 series from india
भारताविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • ऑस्ट्रेलियाने भारताकडून वनडे-टी -२० मालिकेसाठी संघ केला जाहीर 
  • ऑस्ट्रेलियाने मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी १८ खेळाडूंची निवड केली
  • २७ नोव्हेंबरला दोन्ही संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला जाईल. 

सिडनी: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाने १८ खेळाडूंची निवड केली आहे. अ‍ॅरॉन फिंच या दोन्ही प्रकारात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २७ नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. यानंतर दोन्ही संघ ४ डिसेंबरपासून टी-20 मालिका खेळतील. भारतीय संघ आयपीएल 2020 संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर रवाना होईल. दरम्यान, अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. यावेळी तीनही फॉर्मेटसाठी ३२ खेळाडूंचा 'जम्बो स्क्वॉड' जाहीर करण्यात आला आहे.

कॅमेरून ग्रीनला प्रथमच संधी मिळाली

ऑस्ट्रेलियाच्या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचे चांगले संयोजन आहे. एकीकडे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसारखे दिग्गज आहेत, तर दुसरीकडे तरुण मार्नस लाबुशाने आणि कॅमेरून ग्रीन यांनाही संधी देण्यात आली आहे. २१ वर्षीय अष्टपैलू कॅमेरूनची प्रथमच संघात निवड झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कॅमेरूनचा फॉर्म उत्कृष्ट आहे, असे निवड समितीचे ट्रेव्हर होहन्स म्हणाले. भावी खेळाडू म्हणून त्याच्यासाठी संघातील अनुभव मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

ऑस्ट्रेलियाचा १८ सदस्यीय संघ

अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), सीन अबॉट, अॅश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, मोएसेस हेनरिक्स, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅडम जॅम्पा.

वनडे मालिका

  1. पहिली वनडे: शुक्रवार, २७ नोव्हेंबर: सिडनी (डे-नाइट)
  2. दुसरी वनडे: रविवार, २९ नोव्हेंबर: सिडनी (डे-नाइट)
  3. तिसरी वनडे: बुधवार, २ डिसेंबर: कॅनबेरा ((डे-नाइट)

टी 20 मालिका

  1. पहिला टी 20: शुक्रवार, ४ डिसेंबर: कॅनबेरा (रात्री)
  2. दुसरा टी 20: रविवार, ६ डिसेंबर - सिडनी (रात्री)
  3. तिसरा टी 20: मंगळवार, ८ डिसेंबर - सिडनी (रात्री)

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय एकदिवसीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय टी-20 संघ

विराट कोहली, शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (यष्टीरक्षक, उपकर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी