India Vs Australia 2nd odi: विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला रडवलं; 10 विकेट्स राखून टीम इंडियाला हरवलं

India Vs Australia 2nd odi: दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. 10 विकेट्सने दुसऱ्या वनडेत कांगारूंनी विजय मिळवला. या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघं 118 धावांचं आव्हान दिलं होतं.

australia beat india by 10 wickets in ind vs aus 2nd odi
Ind Vs Aus: 10 विकेट्स राखत ऑस्ट्रेलियाचा धमाकेदार विजय   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारूण पराभव केला.
  • भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघं 118 धावांचं आव्हान दिलं होतं.
  • ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीनेच विजय मिळवून दिला.

India Vs Australia: विशाखापट्टणम : दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. 10 विकेट्सने दुसऱ्या वनडेत कांगारूंनी विजय मिळवला. या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघं 118 धावांचं आव्हान दिलं होतं.  ऑस्ट्रेलियाने हे आव्हान अवघ्या 11 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीनेच विजय मिळवून दिला.( australia beat india by 10 wickets in ind vs aus 2nd odi )

अधिक वाचा  : केसांसाठी कडुलिंब आहे फायदेशीर, कोंड्याची समस्या होईल दूर

या दोघांनी 121 धावांची नाबाद भागीदारी केली. मिचेल मार्श याने नाबाद 66 आणि ट्रेव्हिस हेड याने नाबाद 51 धावांची खेळी केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

भारतीय संघाची फलंदाजी ठरली अपयशी 

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने कांगारूच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. अवघ्या 26 षटकात आपला डाव संपवत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर माफक 117 धावा करत 118 धावांचे आव्हान दिलं. भारताचा संपूर्ण संघ 26 व्या षटकात सर्व बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने गोलंदाजी करताना सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर सिन एबोट याने 3 विकेट्स घेतल्या. नॅथन एलिस याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

अधिक वाचा  : दात न घासता पाणी प्या, हे होतील फायदे
 
 टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या चोघांना भोपळाही फोडता आला नाही. अक्षर पटेल याने शेवटपर्यंत नाबाद राहत 29 धावा जोडल्या. ज्यामुळे टीम इंडियाला 100 धावांचा टप्पा पूर्ण करता आला. रविंद्र जडेजा 16 धावा करुन बाद झाला. तर कॅप्टन रोहित शर्मा याने 13 धावा केल्या. या व्यतिरक्त केएल राहुल याने 9, हार्दिक पंड्या 1 आणि कुलदीप यादव याने 4 धावा केल्या.  

अधिक वाचा  : काही मिनिटात उजळेल मुलांची त्वचा

तिसरा सामना निर्णायक
 

आता 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा बुधवारी 22 मार्च रोजी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणारी टीम मालिका जिंकेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी