मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee)वेगवान गोलंदाजांसाठीच्या कार्यभार प्रबंधन नितीच्या पूर्णपणे विरोधात आहे. व्यस्त कार्यक्रमाशिवाय कोविड १९च्या मारामारीदरम्यान बायोबबलचा परिणाम क्रिकेटर्सच्या आयुष्यावरही पडला आहे ज्यामुळे त्यांना खेळापासून दूर व्हावे लागले. लीने ‘लीजेंड्स क्रिकेट लीग’ निमित्ताने बोलताना सांगितले की, तो हा आराम देण्याच्या नियमाच्या विरोधात आहे. त्याच्या मते वेगवान गोलंदाजांना(faster bowler) आराम देणे पसंत नाही आणि प्रत्येक सामन्यांमध्ये तो गोलंदाजांना खेळताना बघणे पसंत करेल. Australia former cricketer brett lee says about Mohammad shami and Jaspreet bumrah
मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सफेद बॉलच्या मालिकेत आराम देण्यात आला होता. ही मालिका भारताने ०-३ अशी गमावली. आता निवड समितीने शमी आणि जसप्रीत बुमराह या भारताच्या वेगवान जोडीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी घरगुती मालिकेला आराम दिला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.
अधिक वाचा - Twitter: भारताच्या या ऑलराऊंडर क्रिकेटरचे ट्विटर अकाऊंट हॅक
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचे याबाबत असे म्हणणे आहे की, एका वेगवान गोलंदाजाला केवळ तेव्हाच आराम दिला गेला पाहिजे जेव्हा त्याला एखादी दुखापत झाली असेल. जर तो दुखापतीने त्रस्त आहे तरच त्याला आराम देणे योग्य ठरते. मात्र वेगवान गोलंदाजांना खूप मेहनत करताना आणि त्याला प्रत्येकवेळेस खेळताना पाहू इच्छितो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताच्या पराभवाबाबत बोलताना ली म्हणाला, हे अपेक्षित नव्हते. कारण हा तो संघ होता ज्याने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवले होते आणि इंग्लंडविरुद्धही २-१ अशी आघाडी घेतली होती.
अधिक वाचा - पक्षात प्रवेश देताच अजित पवारांनी भरवाला नगरसेवकांचा क्लास
ब्रेट ली पुढे म्हणाला, पाहा कधी कधी असे होते. ते खूप चांगले क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये ज्या पद्धतीने ते खेळले त्यांना त्यांच्याच जमिनीवर हरवले आणि नंतर इंग्लंडमध्ये. ली पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या जगातील नंबर वन संघ आहे. मात्र भारत चांगला कसोटी संघ आहे. दक्षिण आफ्रिकेत असे झाले की यजमान संघाने आपल्या भूमीवर चांगली कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि वनडेमध्ये सलग मालिका गमावणे हे विराट कोहलीला सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून हटवणे आणि बीसीसीआयसोबत त्यांचा झालेल्या संघर्षानंतर झाले. दरम्यान, या वादाचा परिणाम भारताच्या कामगिरीवर झाला का असे विचारले असता लीने यावर मौन बाळगणे पसंत केले. यावेळी त्याने अॅशेस मालिकेत ४-० असा विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचेही कौतुक केले.