T20 World cup सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया-भारतीय खेळांडू सोशल मिडियावर भिडले; डेव्हिड वॉर्नरचा रोहित शर्मावर चोरीचा आरोप

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 19, 2021 | 16:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मावर चक्क चोरीचा आरोप केला.

Australia-India players clash on social media ahead of T20 World Cup match, David Warne accuses Rohit Sharma of theft
T20 World cup सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया-भारतीय खेळांडू सोशल मिडियावर भिडले, डेव्हिड वॉर्नचा रोहीत शर्मावर चोरीचा आरोप   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत.
  • टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे अनावरण झाले.
  • David Warner चा हिटमॅन रोहित शर्मावर चोरीचा आरोप

दुबई : टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. टीम इंडियाच्या (Team india) नव्या जर्सीचे 13 ऑक्टोबर ला अनावरण झाले. या स्पर्धेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने  (Opener David Warner) टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मावर (Hitman Rohit Sharma)  चक्क चोरीचा आरोप केला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे. तर चला तर जाणुन घेऊ या काय आहे नेमकं प्रकरण? (David Warne accuses Rohit Sharma of theft)

आयपीएलनंतर टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरू आहेत. टीम इंडिया ही सुपर 12 मध्ये असल्याने सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्यात इंडियाचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. पण तत्पूर्वी सराव म्हणून भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत भिडणार आहे. यातीलच एक सामना काल दुबईच्या मैदानात पार पडला. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड आमने-सामने होते. या सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. 

टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे 13 ऑक्टोबर ला अनावरण झाले. त्यानंतर अनेक खेळाडूंनी ही जर्सी परिधान करुन नवा लुक सोशल अकाऊंट्सवर शेअर केले आहेत. यामध्ये रोहित शर्मानेदेखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या हॉटेलच्या खोलीत दिसत आहे. त्याने एका वेगळ्याच स्टाईलमध्ये टीम इंडियाची नवी वर्ल्ड कप जर्सी परिधान केली आहे. या व्हिडीओवर वॉर्नरने गंमतीदार कमेंट केली आहे. रोहितच्या पोस्टवर कमेंट करत वॉर्नरने, ‘तू माझ्या टिक टॉक स्टाईलची कॉपी करत आहेस’. असे म्हटले आहे.

रोहित शर्माच्या या पोस्टवर, डेव्हिड वॉर्नरने त्याच्यावर त्याच्या टिक-टॉक स्टाईलची कॉपी केल्याचा आरोप केला आहे, तर युजवेंद्र चहल बेडबाबत कमेंट केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी