Australia tour of India 2023, India vs Australia : असा असेल ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

Australia tour of India 2023 detail information in Marathi : टीम ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 4 टेस्ट मॅचची टेस्ट सीरिज आणि 3 वन डे मॅचची वन डे सीरिज होणार आहे. 

Australia tour of India 2023
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
  • ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 4 टेस्ट मॅचची टेस्ट सीरिज आणि 3 वन डे मॅचची वन डे सीरिज
  • ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याची सुरुवात टेस्ट सीरिजने होईल

Australia tour of India 2023 detail information in Marathi : टीम ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 4 टेस्ट मॅचची टेस्ट सीरिज आणि 3 वन डे मॅचची वन डे सीरिज होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याची सुरुवात टेस्ट सीरिजने होईल. पहिली टेस्ट मॅच गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे. ही मॅच नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिशनच्या स्टेडियमवर होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात नागपूर, दिल्ली, धरमशाला, अहमदाबाद या ठिकाणी टेस्ट मॅच होतील. नंतर मुंबई, विशाखापट्टणम, चेन्नई या ठिकाणी वन डे मॅच होतील. 

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील शेवटची मॅच बुधवार 22 मार्च 2023 रोजी होणार आहे. चेन्नईत होणार असलेल्या या वन डे मॅच नंतर ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचा समारोप होईल. 

याआधी भारताने न्यूझीलंड विरुद्धची वन डे आणि टी 20 सीरिज जिंकली. आयसीसी टीम रँकिंगमध्ये भारत टी 20 (267 रेटिंग) आणि वन डे (114 रेटिंग) या दोन्ही प्रकार पहिल्या स्थानावर तर टेस्ट क्रिकेटमध्ये (126 रेटिंग) दुसऱ्या स्थानावर आहे.

शुभमनचा गिलचे फिटनेस सीक्रेट
...आणि इतिहास घडला !, शेर-शुभमन गिल

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

  1. गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 ते सोमवार 13 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली टेस्ट, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर - सकाळी 9.30
  2. शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी टेस्ट, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली - सकाळी 9.30
  3. बुधवार 1 मार्च 2023 ते रविवार 5 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी टेस्ट, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धरमशाला - सकाळी 9.30
  4. गुरुवार 9 मार्च 2023 ते सोमवार 13 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी टेस्ट, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद - सकाळी 9.30
  5. शुक्रवार 17 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली वन डे, वानखेडे स्टेडियम मुंबई - दुपारी 2
  6. रविवार 19 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी वन डे, डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए - व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम - दुपारी 2
  7. बुधवार 22 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी वन डे, एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई - दुपारी 2

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी