World Cup 2019: ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश सामन्यानंतर कोणता संघ कुठल्या स्थानी

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 20, 2019 | 23:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Cup 2019 Points Table: ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात गुरूवारी सामना रंगला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर दमदार विजय मिळवला. पाहा या सामन्यानंतर पॉईंट टेबल

australia team
ऑस्ट्रेलिया संघ 

नॉटिंग्हम: आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्डकप २०१९मध्ये आज बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला. या सामन्यात बांगलादेशने अखेरपर्यंत विजय मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याचे हे प्रयत्न अपुरे पडले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने दमदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० ओव्हरमध्ये ५ बाद ३८१ रन्स केले होते. ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने जबरदस्त १६६ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला साडेतीनशे धावांचा टप्पा पार करता आला. तर आरोन फिंचने ५३ धावा केल्या. उस्मान ख्वाजाने ८९ धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने झटपट ३२ धावा साकारल्या.

यामुळे ऑस्ट्रेलियाला बांगलादेशसमोर विजयासाठी ३८२ धावांचे आव्हान ठेवता आले. हे आव्हान पूर्ण करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. बांगलादेशकडून तामिम इक्बालने ६२ धावांची खेळी केली. यात त्याने ६ चौकार लगावले. तर शाकीब अल हसनने ४१ धावांची खेळी केली. गेल्या सामन्यात धमाकेदार खेळी करणारा लिटन दास या सामन्यात मात्र अपयशी ठरला. त्याला केवळ २० धावा करता आल्या. तर महमुदुल्लाहने ६९ धावांची खेळी केली. यात मुशफिकरने शतकी खेळी केली. मात्र त्याची ही शतकी खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. 

या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचे १० पॉईंट झाले आहेत. तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर, इंग्लंड तिसऱ्या स्थानावर असून भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश सामन्यानंतर कोणता संघ कुठल्या स्थानी Description: World Cup 2019 Points Table: ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात गुरूवारी सामना रंगला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर दमदार विजय मिळवला. पाहा या सामन्यानंतर पॉईंट टेबल
Loading...
Loading...
Loading...