Ind vs Aus: ...म्हणे यांना T-20 वर्ल्डकप जिंकायचाय, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला लोळवलं

IND vs AUS 1st T20I Highlights: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.

australia vs india 1st t20 live score aus won by 4 wickets with 4 balls remaining rohit sharma hardik pandya wade
Ind vs Aus: ...म्हणे यांना T-20 वर्ल्डकप जिंकायचाय  |  फोटो सौजन्य: AP
थोडं पण कामाचं
  • कांगाारुकडून भारताचा दणदणीत पराभव
  • तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी
  • भारताला जिंकावे लागणार पुढील दोन्ही सामने

IND vs AUS 1st T20I Highlights: मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (australia) तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना भारताने (India) 4 गडी राखून गमावला आहे. केएल राहुल आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पण गोलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली नाही. त्यामुळे मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवरील सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार चेंडू आणि 4 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरून ग्रीन आणि मॅथ्यू वेड यांनी धमाकेदार फलंदाजी केली. (australia vs india 1st t20 live score aus won by 4 wickets with 4 balls remaining rohit sharma hardik pandya wade)

असा होता भारतीय डाव

नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी खास झाली नाही. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा पहिल्या विकेटसाठी केवळ 21 धावा करू शकले. तिसऱ्या षटकात रोहित जोश हेजलवूडचा बळी ठरला. बाद होण्यापूर्वी त्याने 9 चेंडूत 11 धावा केल्या. भारताला दुसरा धक्का विराट कोहलीच्या रूपाने बसला, कोहलीने 7 चेंडूत केवळ 2 धावा केल्या. पाचव्या षटकात एलिसने कॅमेरून ग्रीमच्या हाती त्याला झेलबाद केले.

अधिक वाचा: क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते, माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांचा स्ट्रेट ड्राइव्ह

यानंतर राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी आघाडी घेत कांगारू गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 69 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि भारतीय संघाला शतकाच्या पुढे नेले. 

T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 18 वे अर्धशतक झळकावून राहुल पॅव्हेलियनमध्ये परतला. 12व्या षटकात एलिसकडे तो हेझलवूडकरवी झेलबाद झाला. राहुलने 35 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. त्याचवेळी सूर्यकुमारचे अर्धशतक हुकले. त्याला 14व्या षटकात कॅमेरून ग्रीनने बाद केले. सूर्यकुमारने यष्टिरक्षक मॅथ्यू वेडकडे झेल दिला. त्याने 25 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या.

अधिक वाचा: ललित मोदींनी का केली होती युवराजकडे ६ सिक्स ठोकण्याची मागणी? १५ वर्षे पूर्ण

भारताची पाचवी विकेट अक्षर पटेलच्या रूपात पडली, ज्याने 5 चेंडूत 6 धावा केल्या. त्याला 16व्या षटकात एलिसने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. येथून हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनी भारतीय डाव पुढे नेला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली. कार्तिकने 5 चेंडूत 6 धावा केल्या. त्याला 19व्या षटकात एलिसने एलबीडब्ल्यू बाद केले. तर हार्दिक नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 30 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 70 धावा केल्या. हे त्याचे दुसरे टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक आहे. 

अधिक वाचा: Team india captains: टीम इंडियाचे सगळ्यात कमनशिबी कर्णधार

भारत आणि ऑस्ट्रेलिया 2007 पासून आतापर्यंत 23 वेळा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. भारताने 13 सामने जिंकले तर ऑस्ट्रेलियाने 9 सामने जिंकले. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याचवेळी भारतीय भूमीवर दोन्ही संघांमधील सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर आकडेवारीवर अटीतटीची आहे. भारतात दोन्ही संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाला 4 आणि ऑस्ट्रेलियाला 3 मॅचमध्ये विजय मिळाला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी